मुंबईजवळचा 'हा' जिल्हा ठरतोय कोरोनाचा हॉटस्पॉट

मुंबईजवळचा 'हा' जिल्हा ठरतोय कोरोनाचा हॉटस्पॉट

ठाणे- कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र परिस्थिती भयावह झाली आहे.  दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. त्यातच मुंबईला लागूनच असलेल्या ठाणे शहरातली परिस्थिती भयानक झाली आहे. सगळ्यांच्या नजरा मुंबईवर आणि तिच्या बिघडलेल्या कोविडच्या परिस्थितीकडे आहे. अशात त्याच्या लगतचा जिल्हा हळूहळू भारतातील सर्वात वाईट हॉटस्पॉट ठरला आहे. जुलै महिन्याच्या सुरूवातीपासूनच आर्थिक राजधानीला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यात भारतात असलेल्या जिल्ह्यात असा एक जिल्हा आहे जास्त सर्वाधिक रुग्ण आढळून आले. 

गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांचा आकडा वाढता आहे. अशातच या जिल्ह्याची तुलना दिल्लीसोबत करता येणार नाही कारण, दिल्ली हे शहर ११ जिल्ह्यांनी बनलं आहे.  जुलै महिन्याच्या सुरुवातीला ठाणेनं चेन्नईला मागे टाकले असून दररोज सर्वाधिक नवे प्रकरणे नोंदविण्यात आलीत. या दोघांनंतर पुणे जिल्ह्याचा क्रमांक लागतो. या महिन्याच्या सुरुवातीपासूनच ठाण्यात दररोज २ हजार नवीन रुग्ण आढळून येत आहेत. 

ठाणे जिल्ह्याला मुंबईचे विस्तारित उपनगर म्हणून ओळखले जातं. ठाणे जिल्ह्यात सहा महानगरपालिकांचा समावेश आहे. इतर राज्याप्रमाणेच ठाण्यात पहिला रुग्ण हा परदेशातून प्रवास करुन आलेला होता.  आंतरराज्य प्रवास करणाऱ्या बऱ्याच रुग्ण जिल्ह्यात आढळून आले. त्यानंतरच्या आठवड्यात, नागरिकांचा दोन घाऊक भाजी मार्केटशी संपर्क आल्यानं रुग्णांची संख्या जास्त वाढली.

असं लक्षात येतं की, गेल्या तीन महिन्यांपासून मुंबईकडे इतके जास्त लक्ष केंद्रित केले गेले की त्या दरम्यान ठाण्यातील रुग्णवाढीच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत गेली आणि त्याचाच परिणाम आता दिसून येत आहे. २३ जूनपासून, ठाणे जिल्ह्यात सातत्यानं रुग्णसंख्या वाढत गेली. मुंबईच्या तुलनेत या जिल्ह्यातील लोकसंख्याही खूप कमी आहे. तरीही जूनमध्ये मुंबईतल्या नव्या रुग्णांच्या तुलनेत ठाण्यात रुग्णांचा आकडा वाढतच गेला.

10 जुलै रोजी ठाणे जिल्ह्यात त्याच दिवशी मुंबईच्या तुलनेत जवळपास 1 हजार अधिक नव्या रुग्णांची भर पडली. जिल्ह्यातील बरचसे रुग्ण ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई या तीन पालिकांमधील आहे. भिवंडी शहरात सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण 55 टक्क्यांहून अधिक आहे. महाराष्ट्रात किंवा भारतापेक्षा ठाण्यातील प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत आणि त्याचा दर १८ दिवसांनी दुप्पट होत चालला आहे. 

लॉकडाऊनच्या काळातही रुग्णांचा आकडा वाढताच 

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनानं २ जुलैला शहरात कडक निर्बधासह लॉकडाऊन जाहीर केला. दरम्यान, प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत असतानाही  कठोर उपाययोजनांमुळे कोणतीही दिलासा मिळाला नाही. दहा दिवसांच्या कालावधीत सुमारे ३,७९२ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले तर १५८ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला. शहरात एकूण कोरोना रुग्णांचा आकडा १२,९२५ असून ४८० जणांनी आतापर्यंत जीव गमावला आहे.

प्रभागनिहाय दक्षता समिती

शहरातील कोविड-१९चा संसर्ग रोखण्यासाठी टीएमसी वॉर्डनिहाय दक्षता समिती स्थापन करणार आहे. नगरसेवक, अधिकारी, नगराध्यक्ष नरेश म्हस्के, आणि मनपा आयुक्त विपिन शर्मा यांच्यासमवेत या विषयासंदर्भात व्हिडिओ कॉन्सफरिंगद्वारे चर्चा करण्यात आली.

Thane district highest daily new cases India worst hotspots

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com