अपंग, गतिमंदांसाठी तुम्ही काय केलेत? - मंदा म्हात्रे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

मुंबई - अपंग, गतिमंदांच्या शाळेविरुद्ध तुम्ही तक्रारी करता; पण शहरात अपंग वा गतिमंदांसाठी असे पुनर्वसन केंद्र किंवा शाळा उभारणीसाठी तुम्ही कोणते प्रयत्न केलेत, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने गुरुवारी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांना खडसावले.

नवी मुंबईतील एज्युकेशन ट्रेनिंग सेंटरमधील (इटीसी) गैरसोयींबाबत तेथील मुलांच्या पालकांच्या संघटनेने सादर केलेल्या याचिकेवर नुकतीच न्या. विद्यासागर कानडे व न्या. स्वप्ना जोशी यांच्यासमोर सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने म्हात्रे यांना खडसावले. नवी मुंबईत अशाप्रकारे अपंग, गतिमंद यांना प्रशिक्षण मिळावे यासाठी सरकार जादा शाळा किंवा केंद्र उभारणार आहे का, अशी विचारणाही खंडपीठाने केली.

पृथ्वी पालक संस्थेची ही याचिका आहे. पूर्वी गतिमंद विद्यार्थ्यांच्या शाळेची वेळ सहा तास होती, आता ती साडेतीन तासांवर आणण्यात आली आहे. केवळ कर्णबधिर मुलांसाठी मात्र सहा तास शाळा वा केंद्र चालते, असा अर्जदारांचा दावा आहे. या संदर्भात म्हात्रे यांनीही या शाळेविरुद्ध तक्रारी केल्याचे खंडपीठाला सांगण्यात आले. त्यामुळे "तुम्ही विशेष मुलांसाठी अशा शाळा उभारल्या आहेत का, ते सांगा?' असे उच्च न्यायालयाने त्यांना विचारले. याचिकेत म्हात्रे यांना पक्षकार करावे, असेही न्यायालयाने अर्जदारांना सांगितले. पुढील सुनावणी 21 नोव्हेंबरला होईल.

Web Title: manda mhatre question by high court

टॅग्स