मुंबई : सेल्फ टेस्ट किटसाठी 'मोबाईल क्रमांक' सक्तीचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Covid-19 Self Test Kit
मुंबई : सेल्फ टेस्ट किटसाठी 'मोबाईल क्रमांक' सक्तीचा

मुंबई : सेल्फ टेस्ट किटसाठी 'मोबाईल क्रमांक' सक्तीचा

मुंबई : कोविडची सेल्फ टेस्ट किट (covid Self test kit)खरेदी करणाऱ्यांना आता पुर्ण निवासी पत्यासह मोबाईल क्रमांक (mobile number)नमुद असलेले फॉर्म भरुन द्यावा लागणार आहे. महानगर पालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation)याबाबत परीपत्रक प्रसिध्द केले आहे. यात ग्राहकां बरोबर,उत्पादक कंपन्या,वितरक,दुकानदार यांच्यासाठी नियमावली तयार केली आहे.कोविडच्या तीन लाखाहून अधिक सेल्फ किटची विक्री झाली आहे. मात्र,त्यातील फक्त एक लाख अहवाल प्राप्त झाले आहेत. उर्वरीत दोन लाख नागरीकांनी अहवाल संबंधीत मोबाईल ॲप्लिकेशनवर (Mobile application)भरलेले नसल्याने त्यांच्या बाबत कोणतीही माहिती महानगर पालिकेकडे उपलब्ध नाही.

हेही वाचा: चोरांचा मटणावर डल्ला, मतदारांनी अंड्यांवर भागवली भूक

महानगर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर केंद्र सरकारनेही निर्देश दिले आहेत. महापालिका प्रशासनाने नियमावली तयार केली आहे. या नियमावली नुसार उत्पादक कंपन्या आणि वितरक यांना मुंबईतील औषधांची दुकाने,दवाखान्यांना विकल्या गेलेल्या किटबाबत माहिती भरलेले फॉर्म अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तांना whogmp.mahafda@gmail.com वर तसेच महापालिकेच्या साथ नियंत्रण विभागाला mcgm.hometests@gmail.com या ईमेलवर पाठविणे आवश्‍यक आहे.तसेच,विक्रेते आणि दवाखान्यांनाही खरेदीदाराचा नाव,पत्ता आणि मोबाईल क्रमांक नमुद असलेले फॉर्म भरुन घ्यायचा आहे.तसेच हा अर्ज अन्न व औषध प्रशासनासह महापालिकेच्या ईमेलवर पाठवायचा आहे.या दोन्ही अर्जांचे नमुनेही महापालिकेने प्रसिध्द केले आहेत.(Covid-19 Self Test Kit news)

हेही वाचा: मुलीच्या छेडछाडीच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू

एफडीए काय करणार

एफडीए मुंबईतील खरेदीदार सर्व विक्रेते आणि वितरकांच्या होम टेस्टिंग अँटीजेन किट्सच्या वितरण आणि विक्रीवर देखरेख ठेवतील . खरेदी करणार्‍या व्यक्तीला दिलेल्या ऍपवर चाचणी अहवाल कळवण्यास सांगितलं जाईल .

पालिका काय करणार

उत्पादक, वितरक, केमिस्ट, फार्मसी, मेडिकल स्टोअर्स इत्यादींकडून होम टेस्टिंग अँटीजेन किट्सशी संबंधित डेटा इमेलद्वारे प्राप्त केला जाईल, त्यावर साथ नियंत्रक विभाग वर्गिकरण करुन संबंधीत विभागाकडे ही माहिती पाठवली जाईल.संबंधीत व्यक्ती त्याचा चाचणीचा अहवाल आयसीएमआरच्या संकेत स्थळावर अथवा ॲपवर अपलोड करेल याची खबरदारी प्रभागातील आरोग्य अधिकाऱ्याने घ्यायची आहे.तसेच,अहवाल होकारात्मक असल्यास पुढील कार्यवाही करण्यात येईल.(Mumbai News)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top