
मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या सलग मुसळधार पावसामुळे परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज महानगरपालिकेच्या मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. शहरातील पूरस्थिती, नाले-नद्या, पाणी उपसा व्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या उपाययोजना यांचा सविस्तर आढावा त्यांनी घेतला.