आंब्याचे दर कोसळल्याने कोकणातील शेतकरी हवालदिल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

नवी मुंबई - हापूसचे दर कमी झाल्याने खवय्यांना आनंद झाला असला तरी कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी मात्र हवालदिल झाले आहेत. हापूस पिकवण्यासाठी आलेला खर्चही निघत नसल्यामुळे सरकारने यावर तोडगा काढावा, अशी मागणी रत्नागिरी आंबा उत्पादक संघाने केली आहे.

वाशीतील घाऊक फळ बाजारात मोठ्या प्रमाणात हापूस आंबा येत आहे. कोकणातील हापूसबरोबरच कर्नाटकचाही हापूस बाजारात आल्यामुळे आंब्याचे दर कोसळले आहेत. कोकणातील हापूसच्या ५० ते ५५ हजार पेट्या दररोज बाजारात येत आहेत. कर्नाटक हापूसच्याही २५ ते ३० हजार पेट्या दररोज येत आहेत. कर्नाटक हापूस कोकणातील हापूससारखाच दिसतो. ग्राहकांना तो ओळखता येत नसल्याने काही किरकोळ व्यापारी कर्नाटक हापूस कोकणातील हापूस म्हणून विकत आहेत. यामुळे कोकणातील हापूसचे दर दिवसेंदिवस कमी होत आहेत. याचा फटका कोकणातील आंबा बागायतदारांना बसत आहे.

Web Title: Mango prices collapsed