
BBC अर्थचा ‘अर्थ चॅम्पियन्स’ उपक्रम पर्यावरणासाठी सकारात्मक बदल घडवणाऱ्या व्यक्तींचा गौरव करतो.
नवी मुंबईतील पर्यावरणवादी व सामाजिक कार्यकर्ते धर्मेश बरई यांना या महिन्याचे अर्थ चॅम्पियन म्हणून निवडण्यात आलं.
त्यांनी फ्लेमिंगो व स्थलांतरित पक्ष्यांच्या संवर्धनासाठी मोठे प्रयत्न केले असून 90,000+ स्वयंसेवकांना पर्यावरणीय मोहिमेत सहभागी करून घेतलं आहे.