वर्सोवा येथे खारफुटीचा मोठ्या प्रमाणात नाश | varsova news update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Varsova mangroves

वर्सोवा येथे खारफुटीचा मोठ्या प्रमाणात नाश

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : खारफुटी क्षेत्रात (Mangroves) अवैध पद्धतीने राडारोडा फेकण्याचे प्रमाण वाढले आहे. ही अतिशय गंभीर समस्या असल्याचे वॉचडॉग फाऊंडेशनचे (Watch dog foundation) प्रमुख गॉडफ्राय पिमेंटा (Godfrey Pimenta) यांनी सांगितले. समुद्रातील वेगवेगळ्या प्रकल्पामुळे (Sea project) किनारपट्ट्या धोक्यात आल्या आहेत. किनारपट्टीच्या पाण्याचे प्रदूषण वाढत आहे. त्यातच अशा प्रकरणामुळे किनारपट्ट्यांचा धोका (Beach in risk) वाढला असल्याचे पिमेंटा यांनी सांगितले.

हेही वाचा: मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या १९५ नव्या रुग्णांची भर; एकाचा मृत्यू

राडारोडा फेकण्याच्या मागे बिल्डर लॉबी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राडारोडा टाकून भूखंड तयार करण्याचा किंवा झोपडपट्टी वसवण्याचा डाव यामागे असण्याची शक्यता आहे. यावर संबंधित विभागाने कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र त्यांच्याकडून या गंभीर प्रकरणांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.

चक्रीवादळ आणि किनारपट्टीची धूप इत्यादी दरम्यान खारफुटी हे संरक्षण म्हणून काम करतात. मात्र, आज तेही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. किनारपट्ट्यांसह खारफुटी वाचवणे गरजेचे असून त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महापालिका आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यावर योग्य ती पावले उचलून तत्काळ दोषींवर कारवाई करण्याची मागणी पिमेंटा यांनी केली आहे.

loading image
go to top