मानखुर्द ते पनवेल लोकल होणार सुसाट! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

मुंबई  - रुळाला तडा जाणे, पेंटाग्राफ तुटणे आदी कारणांमुळे नेहमीच हार्बर मार्गावरील लोकल विलंबाने धावत असतात. प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. यावर उपाय म्हणून रेल्वेने हार्बर मार्गावरील लोकलचा वेग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील मानखुर्द ते पनवेलपर्यंतचा प्रवास सुसाट होणार आहे. 

सध्या हार्बर मार्गावर लोकल 80 किलोमीटर वेगाने चालवली जाते. अनेकदा विविध तांत्रिक कारणांमुळे हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळित होते. मानखुर्द ते पनवेलपर्यंतच्या टप्प्यात लोकलचा वेग वाढवण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासन प्रयत्न करीत आहे. 105 किलोमीटर वेगाने लोकल चालवण्यासंदर्भात रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठवला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास आणि रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी परवानगी दिल्यास सुरुवातीला या मार्गावर चाचणी घेण्यात येईल. लोकलचा वेग वाढल्यास मानखुर्द ते पनवेलपर्यंतच्या प्रवासातील 10 ते 15 मिनिटांची बचत होईल, असा दावा मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक संजयकुमार जैन यांनी केला आहे. 

हार्बर मार्गावर अंधेरी ते पनवेलदरम्यान सद्यस्थितीत 18 फेऱ्या चालवण्यात येतात. यापैकी किती फेऱ्यांचा गोरेगावपर्यंत विस्तार करायचा यावर विचारविनिमय सुरू आहे. येत्या काही दिवसांत यावर निर्णय होण्याची शक्‍यता असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

Web Title: Mankhurd to Panvel locals train