Manoj Jarange: मुंबईत आंदोलनाला परवानगी नाकारली, मनोज जरांगे आक्रमक; काय म्हणाले?

Manoj Jarange Mumbai Protest: पोलिसांनी मनोज जरांगे यांची मुंबईत उपोषणाला बसण्याची परवानगी नाकारली असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत.
Manoj Jarange Mumbai protest

Manoj Jarange Mumbai protest

Esakal

Updated on

मुंबई : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. त्यानंतर आता ते मुंबईच्या दिशेने आगेकूच करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मराठा आंदोलकांसह मनोज जरांगे पाटील १५ सप्टेंबरपासून अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघणार असून मुंबईतील आझाद मैदान येथे उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे. यासाठी त्यांनी पोलिसांना एक पत्र पाठवत आंदोलनासंदर्भात परवानगीची मागणी केली आहे. मात्र पोलिसांनी मुंबईत उपोषणाला बसण्याची परवानगी नाकारली असल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com