
Summary
मनोज जरांगे यांनी जाहीर केले की ते उद्यापासून पाण्याचा थेंबही न घेता कडक उपोषण सुरू करणार आहेत.
मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळाले पाहिजे, तोपर्यंत मुंबई सोडणार नाहीत असा त्यांचा निर्धार आहे.
समाजाच्या नावाखाली पैसे गोळा करणाऱ्यांवर त्यांनी निशाणा साधत मराठा समाजाला आंदोलनासाठी पैसे न देण्याचे आवाहन केले.
Manoj Jarange Hunger Strike : सरकार मराठ्यांच्या मागण्यांवर अमंलबजावणी करत नाहीये, त्यामुळे मी उद्यापासून पाणी पिणे देखील सोडणार आहे. असा ठाम निर्धार मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. ते म्हणाले की, मराठ्यांनी दगडफेक, गोंधळ करु नये, मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, उद्यापासून कडक उपोषण सुरु करणार असल्याचे जरांगे यांनी जाहीर केले. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे.