
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. ते पुन्हा मुंबईत दाखल झाले असून थोड्याच वेळात आझाद मैदानात पोहचतील. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी हजारो मराठा बांधव मुंबईत पोहोचले आहेत. रात्रीपासूनच काही आंदोलक रेल्वेने दाखल झाले. ते सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्मवरच झोपले होते. तर आझाद मैदानही आंदोलकांच्या गर्दीने गजबजलं आहे.