esakal | मनोर : उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत मद्याचा साठा जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

palghar

मनोर : उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत मद्याचा साठा जप्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मनोर : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गुरुवारी सकाळी केलेल्या कारवाईत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला परराज्यातील विदेशी मद्य आणि बिअरचा साठा जप्त करण्यात आला आहे.कारवाईत रिक्षासह एक लाख वीस हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुरुवारी सकाळी उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने तलासरी तालुक्यातील उंबरपाडा कोचाई रस्त्यावर परराज्यातील विदेशी मद्याची वाहतूक करणारा जप्त करण्यात आला आहे.रिक्षातविदेशी मद्याच्या 144 आणि बियरच्या 192 बाटल्या आढळून आल्या.तीन बचाकी रिक्षासह एकूण लाख वीस हाजरांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कारवाई उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथकाचे निरीक्षण शंकर आंबेरकर यांच्यासह दापचरी सीमा तपासणी नाका निरीक्षक आणि डहाणूच्या निरीक्षकांनी भाग घेतला होता.

loading image
go to top