
डोंबिवली : बनावट धनादेश देऊन बॅंकेला २४ कोटींचा गंडा; टोळी गजाआड
डोंबिवली : एका कंपनीच्या नावे बनावट धनादेश (fake cheque) तयार करुन बॅंकेला तब्बल 24 कोटींचा गंडा (twenty four crore fraud) घालण्याचा प्रयत्न एका टोळीने केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात (Manpada police station) तक्रार दाखल करण्यात आली असून आत्तापर्यंत पोलिसांनी 7 आरोपींना याप्रकरणी (seven culprit arrested) अटक केली आहे.
हेही वाचा: BMC : प्रभाग रचना शिवसेनेच्या पथ्यावर; सहा प्रभागात शिवसेनेचे वर्चस्व
यातील तिघांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने 6 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून उर्वरीत चौघांची कल्याणच्या आधारवाडी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. हरिश्चंद्र कडव, अशोक चौधरी (वय 51) व नितीन शेलार (वय 40) अशी अटक तीन आरोपींची नावे आहेत. कल्याण शीळ रोडवरील एचडीएफसी बॅंकेच्या दावडी येथील शाखा मॅनेजर विशाल व्यास यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये बनावट धनादेश तयार करुन काहींनी बॅंकेची फसवणूक केल्याची तक्रार मानपाडा पोलिस ठाण्यात दाखल केली होती.
यातील आरोपींनी इंडस टॉवर प्रा. लि. कंपनीच्या मालकीचा 24 करोड रुपयांचा बोगस धनादेश तयार करत तो बॅंकेत सादर केला होता. विशेष म्हणजे त्या धनादेशावर करण्यात आलेल्या बोगस स्वाक्षऱ्या या देखील तंतोतंत जुळत असल्याचे बॅंक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले असल्याचे तक्रारीत म्हटले होते. दाखल तक्रारीनुसार मानपाडा पोलिसांनी तपासास सुरुवात केली. यामध्ये आरोपींची एक टोळी असल्याचे उघडकीस आले होते. ही टोळी खातेधारकांचे बॅंक डिटेल्स गोळा करणे, त्याची माहिती काढणे त्या माहितीच्या आधारे बनावट धनादेश तयार करण्याचे काम ही टोळी करत असे.
एक साधा धनादेश घेऊन त्यावरील खातानंबर खोडून नविन खातानंबर प्रिट केला जात असे. त्यानंतर नकली स्वाक्षऱ्या त्यावर करुन एका खात्यावरुन दुसऱ्या खात्यावर पैसे पाठविले जात असत. पैसे ट्रान्सफर करुन घेण्यासाठी देखील डमी खात्याचा वापर केला जात असे. अशापद्धतीने या आरोपींनी आत्तापर्यंत 50 पेक्षा जास्त नकली धनादेश बनविल्याचे तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी चार जणांना पोलिसांनी आधीच अटक केली असून त्यांची रवानगी सध्या कल्याणच्या आधारवाडी कारागृहात करण्यात आली आहे. तर उर्वरीत तीन आरोपींना नुकतीच पोलिसांनी अटक केली आहे. याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
Web Title: Manpada Police Arrested Seven Culprits Giving Fake Cheque To Bank And Fraud Twenty Four Crore Rupees
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..