मनसुख हिरेन Case Solved! महाराष्ट्र 'एटीएस'च्या शिवदीप लांडेंची माहिती

Shivdeep-Lande-ATS
Shivdeep-Lande-ATS

गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवणाऱ्या मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा अखेर छडा लागला. महाराष्ट्र एटीएसचे (दहशतवाद विरोधी पथक) डीआयजी शिवदीप लांडे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असल्याची माहिती दिली. मनसुख हिरेन यांच्या मालकीची कार स्फोटकांनी भरलेल्या अवस्थेत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळली. त्यानंतर काही दिवसांतच मनसुख हिरेन यांचाही संशयास्पद मृत्यू झाला. हिरेन यांची हत्या सचिन वाझे यांनीच केली असा संशय हिरेन यांच्या पत्नीने व्यक्त केला. त्यामुळे स्फोटकांचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेला देण्यात आला तर मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास एटीएस महराष्ट्रकडे सुपूर्द करण्यात आला. या प्रकरणी तपास केल्यानंतर रविवारी या प्रकरणाचं गूढ उकलण्यात महाराष्ट्र एटीएसला यश आल्याचं शिवदीप लांडे यांनी सांगितलं.

एकीकडे राज्यात सचिन वाझे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे होत चालले आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे पोलीस दलासह राजकीय वर्तुळातही खळबळ माजली आहे. पण अशातच मनसुख हिरेन प्रकरणात मात्र रविवारी दोघांना अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणाचा छडा लागला असल्याची माहिती महाराष्ट्र एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे यांनी दिली आहे. 'अत्यंत संवेदनशील मनसुख हिरेन खून प्रकरणाचं गूढ उकलण्यात आम्हाला यश आलं आहे. मी माझ्या एटीएस पोलीस दलातील सर्व सहकाऱ्यांना मनापासून सलाम करतो. त्यांनी या प्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून रात्रीचा दिवस करून न्यायपूर्ण पद्धतीने प्रकरणाचा तपास केला. हे प्रकरण माझ्या पोलीस दलातील कारकीर्दीमधील कठीण प्रकरणांपैकी एक होते', अशी फेसबुक पोस्ट शिवदीप लांडे यांनी केली.

मुंबई पोलीस दलातून निलंबित करण्यात आलेले पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदे आणि सट्टेबाजारी करणारा बुकी नरेश गोर याला रविवारी महाराष्ट्र एटीएसने अटक केली. त्यानंतर शिवदीप लांडे यांनी फेसबुक पोस्ट करून अत्यंत संवेदनशील मनसुख हिरेन खून प्रकरणाचा गुंता सुटल्याचे सांगितले. असे असले तरी या प्रकरणाबाबत अद्याप एटीएसकडून अधिकृत कोणतीही माहिती किंवा पत्रक जारी करण्यात आलेले नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितनुसार, या प्रकरणात सचिन वाझे यांना मुख्य आरोपी ठरवण्यात आले असून त्यांना मदत केल्याप्रकरणी इतर दोघांना अटक झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com