मंत्रिमंडळ विस्ताराला ऑगस्टचा मुहूर्त

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 18 जुलै 2018

मुंबई - राज्यातील फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी ऑगस्टपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. शिवसेनेला समवेत घेण्याची भाजपची इच्छा आहे. भाजपच्या केंद्र आणि राज्यातल्या नेत्यांनी यासंबंधात चर्चा केल्याचे बोलले जाते. भाजपच्या अंतर्गत कार्यक्रमात आमदारांनी उत्तम योगदान द्यावे, अशी पक्षाध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अपेक्षा आहे. हे विस्तारकार्य, तसेच संसदेचे अधिवेशन आटोपल्यावर मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांची भर पडेल.

विद्यमान सदस्यांमधून कुणालाही वगळले जाण्याची शक्‍यता नाही. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांना डिच्चू देऊन नाराज करणे योग्य ठरणार नाही, त्यामुळे फक्त नव्यांचा समावेश असे शपथविधीचे स्वरूप असेल, असे समजते.

Web Title: mantrimandal expansion august