esakal | गो कोरोना गो साठी थाई मसाजचा पर्याय; लोकांच्या भीतीचं 'असं'ही भांडवल...
sakal

बोलून बातमी शोधा

गो कोरोना गो साठी थाई मसाजचा पर्याय; लोकांच्या भीतीचं 'असं'ही भांडवल...

गो कोरोना गो साठी थाई मसाजचा पर्याय; लोकांच्या भीतीचं 'असं'ही भांडवल...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोनानं संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. जगभरात कोरोनामुळे तब्बल ८००० पेक्षा अधिक नागरिक दगावलेत. भारतातही कोरोना पसरत चालला आहे. भारतात कोरोना स्टेज २ वरून स्टेज ३ वर जाऊ नये म्हणून प्रशासनाकडून काळजी घेतली जातेय. लोकांमध्ये देखील कोरोनाची भीती आहे. मात्र काही कंपन्यांना लोकांच्या भीतीचा कसा फायदा उचलायचा हे चांगलं ठाऊक आहे. लोकांच्या भीतीचा फायदा घेऊन स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी या कंपन्या काय करतील काहीही सांगता येत नाही. सध्या काही कंपन्या, "कोरोनापासून बचाव करण्यासाठी आमच्याकडे या आणि मसाज घ्या" असं आवाहन करणारे मेसेज पाठवतायत. अनेकांना मोबाईलवर असे मेसेजेस आलेत. 

मोठी बातमी - कोरोनामुळे मुंबईत केवळ 'याच' दिवशी सुरु राहणार दुकानं, पाहा कोणत्या भागात कधी सुरु राहणार दुकानं

नक्की काय लिहिलंय  या मेसेजेसमध्ये  : 

मेसेज नंबर १ :  IMROVE UR BODY'S IMMUNITY TO FIGHT OFF VIRUSES WITH OUR BODY THERAPY THAT WORKS AS A NATURAL DEFENCE IN 1999/- ONLY @AURATHAI SPA CALL: 8655224333/ 8655109595

मेसेज नंबर २ : go corona go..any 60 min therapy 1299/-  only in aura thai spa chembur east valid till 5pm call 8655224333 /  8655109595 / 8104645448

"आमच्या बॉडी थेरपी ला या आणि कोणत्याही व्हायरसपासून बचाव करण्यासाठी तुमची रोग प्रतिकारक क्षमता वाढवा आणि फक्त १९९९ रुपयांत नैसर्गिकरित्या कोरोनापासून तुमचा बचाव करा." याचसोबत "गो कोरोना गो.. कोणतीही साठ मिनिटाची थेरेपी १२९९ रुपयांमध्ये. फक्त ऑरा थाई स्पामध्ये." अशा प्रकारचे हे मेसेजेस आहेत.        

मोठी बातमी - जरा ऐका आणि चुपचाप घरात राहा ! होम क्वारंटाईनचा शिक्का घेऊन प्रवास करणारे आणखी सहा पकडले

स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी असे मेसेजेस पाठवायला सुरुवात झालीये. 'आमच्याकडे या थाई थेरपी करा आणि कोरोनापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक क्षमता वाढवा'  असं या मेसेजमध्ये लिहिलं आहे. विशेष म्हणजे या मेसेजमध्ये कोरोना 'व्हारसपासून नैसर्गिकरित्या बचाव करा' असं लिहिण्यात आलंय.

अनेकजण घाबरून अशा कंपन्यांशी संपर्क साधतात आणि खोट्या मेसेजेसचे बळी पडतात. या कंपन्यांकडून अशा प्रकारच्या थेरपीसाठी  एक तासाचे तब्ब्ल १२०० ते २००० रुपये आकारले जात आहेत.

एकीकडे कोरोनामुळे नागरिक चांगलेच धास्तावलेत. अशात लोकांच्या भीतीचं भांडवल करणाऱ्या कंपन्या लोकांपर्यंत पोहोचून स्वतःचे खिसे भरण्याचं काम करतायत. कोरोनाशी लढण्यासाठी आपलं सरकार सतर्क आहेच, अशात आता सरकारकडून या कंपन्यांवर कधी कारवाई होतेय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

many companies in mumbai sending messages to enchash fear of corona virus

loading image
go to top