कोरोनामुळे मुंबईत केवळ 'याच' दिवशी सुरु राहणार दुकानं, पाहा कोणत्या भागात कधी सुरु राहणार दुकानं

कोरोनामुळे मुंबईत केवळ 'याच' दिवशी सुरु राहणार दुकानं, पाहा कोणत्या भागात कधी सुरु राहणार दुकानं

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना वेगानं पसरत चालला आहे. राज्यात कोरोनाचे एकूण  ४७ रुग्ण आढळले आहेत. तर शासनाकडून लोकांना गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन केलं जातंय. याच पार्श्वभूमीवर आता मुंबईच्या काही भागांमध्ये दुकानं एक दिवसाआड बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नॉवेल कोरोनाचा फैलाव थांबवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलाय. 

काही दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. कोरोना राज्यात पसरू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी मुंबईच्या काही भागांमध्ये दुकानं एक दिवसाआड बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला आहे. गर्दीची ठिकाणं आणि बाजारपेठ असलेल्या परिसरात या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. 

मुंबईच्या काही भागांमध्ये दुकानं  सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार यादिवशी खुली असणार आहेत. तर काही भागांमध्ये दुकानं मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार यादिवशी सुरु असणार आहेत. 

कुठली दुकानं राहणार एक दिवसाआड बंद:

सोमवार, बुधवार, शुक्रवार, रविवार या भागातील दुकानं सुरु राहणार :

दादर:

  • न. चि. केळकर मार्ग (पूर्व बाजू)
  • डिसिल्व्हा रोड
  • छबिलदास रोड
  • एस. के. बोले मार्ग (दक्षिण बाजू)
  • सेनापती बापट रोड (कोहिनूर इन्स्टिट्यूट ते हाॅकर्स प्लाझा)

माहीम:

  • टी. एच. कटारिया मार्ग (दक्षिण बाजू- गंगाविहार हाॅटेल ते शोभा हाॅटेल)
  • लेडी जमशेदजी क्राॅस रोड (दर्गा गल्ली)

धारावी:

  • ९० फूट रोड (पश्चिम बाजू-६० फूट रोड ते संत रोहिदास मार्ग)
  • आंध्र व्हॅली रोड (पश्चिम बाजू)
  • महात्मा गांधी मार्ग (पश्चिम बाजू)

मंगळवार, गुरुवार, शनिवार, रविवार या भागातील दुकानं सुरु राहणार :

दादर:

  • न. चिं. केळकर मार्ग (पश्चिम बाजू)
  • मो. चि. जावळे मार्ग (भवानी शंकर रोड पालिका शाळेपर्यंत)
  • रानडे रोड
  • एस. के. बोले मार्ग (उत्तर बाजू)

shops will remain close by one day gap in some parts of mumbai read full story

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com