अनेक आयटीयन्सचा महाराष्ट्रात परतण्यास नकार

वृत्तसंस्था
बुधवार, 6 मे 2020

महाराष्ट्रातील स्थलांतरीतांना पाठवण्याची व्यवस्था होत असताना महाराष्ट्राबाहेर असलेल्या राज्यात परत आणण्याचा विचार होत आहे. महाराष्ट्रातील अनेक जण आंध्र प्रदेश, नवी दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा, तमिळनाडूत आहेत. त्यातील अनेक जण तेथील आयटी क्षेत्रात काम करीत आहेत. त्यामुळे अर्थातच तेथील नोकरी सोडून ते राज्यात परतण्यास तयार नाहीत.

मुंबई : तीस हजार स्थलांतरीत महाराष्ट्रातून इतर राज्यात गेले आहेत, तर महाराष्ट्राबाहेर अडकलेले राज्यातील वीस हजार परतले आहेत. स्थलांतरीतांना राज्यात परत पाठवण्याची प्रक्रिया खूपच वेळखाऊ आहे. महाराष्ट्रातील स्थलांतरीतांना पाठवण्याची व्यवस्था होत असताना महाराष्ट्राबाहेर असलेल्या राज्यात परत आणण्याचा विचार होत आहे. महाराष्ट्रातील अनेक जण आंध्र प्रदेश, नवी दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा, तमिळनाडूत आहेत. त्यातील अनेक जण तेथील आयटी क्षेत्रात काम करीत आहेत. त्यामुळे अर्थातच तेथील नोकरी सोडून ते राज्यात परतण्यास तयार नाहीत. त्याशिवाय राज्यात कोरोनाचे संकट वाढत असताना धोका का पत्करायचा, असा सवाल त्यांनी व्यक्त केला आहे.

मोठी बातमी ः ...म्हणून स्थलांतरितांना घेऊन जाणाऱ्या रेल्वे मुंबई बाहेरून सुटल्या

इतर राज्यात अडकलेल्या लोकांना त्यांच्या गृहराज्यात परतण्यासाठी त्यांच्याकडे आधार कार्ड तसेच डॉक्टरांचे प्रमाणपत्राची आवश्यकता लागत आहे. त्यानंतर एकाच ठिकाणी जाणारे बाराशे जमल्यावर त्यांच्यासाठी ट्रेन आरक्षित करण्याचे ठरते. जिल्हाधिकाऱ्यांना आरक्षित केलेल्या ट्रेनचे पूर्ण भाडे आगाऊ द्यावे लागते, याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. 

मोठी बातमी ः कोरोनाचा धोका कायम! मुंबईतील आणखी एक कोळीवाडा सील

गुजरातमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील दोन हजार कामगार पालघरमार्गे नुकतेच राज्यात परतले आहेत. गुजरात सरकारने याबाबतची विस्तृत माहीती महाराष्ट्र सरकारला पाठवली होती. त्यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यामुळे महाराष्ट्रात त्यांना प्रवेश देण्यात आला. राज्य सरकारने महाराष्ट्राबाहेर असलेल्या राज्यातील स्थलांतरीतांना आणण्यासाठी ते स्थलांतरीत असलेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे. राज्यात आल्यावर त्या सर्व कागदपत्रांची चाचणी करुनच त्यांना प्रवेश दिला जातो. अर्थात त्यानंतर 14 दिवस विलगीकरणात रहावे लागते. जळगाव आणि नंदूरबारमध्ये काही दिवसांपूर्वी गुजरातहून सतरा हजार जण आले. त्यातील अनेकांकडे कोणतेही प्रमाणपत्र नव्हते. त्यामुळे त्या जिल्ह्यांचा चांगलाच कस लागला. चंद्रपूरमध्ये तेलंगणातून एक हजार जण परतले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: many itans not interested to come back in maharashtra amid corona outbreak