esakal | ...म्हणून स्थलांतरितांना घेऊन जाणाऱ्या रेल्वे मुंबई बाहेरून सुटल्या
sakal

बोलून बातमी शोधा

shramik train

परराज्यातील स्थलांतरितांना त्यांच्या राज्यात घेऊन जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडल्या जात आहे. मात्र मुंबईतील स्थलांतरितांना रवाना करण्यासाठी सुटणाऱ्या रेल्वेगाड्या मुंबईतील नेहमीच्या स्थानकांऐवजी मुंबई बाहेरील स्थानकांवरून सुटत आहे

...म्हणून स्थलांतरितांना घेऊन जाणाऱ्या रेल्वे मुंबई बाहेरून सुटल्या

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : परराज्यातील स्थलांतरितांना त्यांच्या राज्यात घेऊन जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडल्या जात आहे. मात्र मुंबईतील स्थलांतरितांना रवाना करण्यासाठी सुटणाऱ्या रेल्वेगाड्या मुंबईतील नेहमीच्या स्थानकांऐवजी मुंबई बाहेरील स्थानकांवरून सुटत आहे. स्थलांतरितांसाठी मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस, दादर, मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रेल्वे न सोडता मध्य रेल्वेने भिवंडी, कल्याण तर पश्चिम रेल्वेने वसई रोड, डहाणू रोड येथून खास रेल्वे सोडल्या आहेत. मुंबईतील महत्वाची स्थानके ही कंटेन्मेन्ट झोनमध्ये असल्याने तेथे गर्दी होऊ नये म्हणून ही उपाययोजना राबवल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोठी बातमी ः येस बँकप्रकरणी राणा कपूर आणि कुटुंबियांविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल

कल्याणहून सुटलेल्या या रेल्वेमधील प्रवासी मुंबईच्या विविध भागातून आले होते. दाणा बंदर, मस्जिद बंदर येथे काम करणाऱ्या कामगार गुंटूरला जाणाऱ्या रेल्वेने पाठवले. गुंटूरला निघालेल्यांपैकी अनेकांनी आपले फॉर्म तीन दिवसांपूर्वी भरले होते. त्यांना पोलिसांनी बॅगसह येण्यास सांगितले. ते ज्यावेळी बोलावलेल्या ठिकाणी एकत्र आले, त्यावेळी त्यांना आपली रेल्वे कुठून सुटणार हेही त्यांना माहिती नव्हते. डोंगरी पोलिसांनी त्यांच्या क्षेत्रातील 942 स्थलांतरितांना पाठवण्यासाठी 35 बसची व्यवस्था केली होती. 

मोठी बातमी ः कोरोनाचा धोका कायम! मुंबईतील आणखी एक कोळीवाडा सील

बिहारमधील अनेक स्थलांतरितांनी विलेपार्ले येथील पोलिस स्टेशनमध्ये नोंदणी केली होती. त्यातील अनेकांना तर आपल्याला गावाकडे जायची संधी मिळेल, ही आशा सोडली होती, पण गावाकडे जाण्याची तयारी करुन या असा कॉल आल्यानंतर त्यांना सुखद धक्का बसला होता. स्थलांतरीत केवळ रेल्वेनेच परतत नाहीत, तर काहींनी बसही आरक्षित केली आहेत. त्यातील अनेकजण गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानला बसने रवाना झाले आहेत.