कामगार तर मुंबईत परतायत; मात्र हाताला पुरेसे कामच नसल्याने करायचे तरी काय?

कामगार तर मुंबईत परतायत; मात्र हाताला पुरेसे कामच नसल्याने करायचे तरी काय?

मुंबई : पाच महिन्यांच्या लॉकडाऊननंतर आता अनेक उद्योगधंदे टप्प्याटप्प्याने सुरु होत आहे. सुरुवातीला हाताला काम नसल्याने अनेक स्थलांतरित कामगार आपापल्या गावांकडे परतले होते. मात्र, पोटाची खळगी भरण्यासाठी गावाकडे अन्य कोणताही पर्याय नसल्याने अनेक कामगार मुंबईसह शहराकडे परतू लागले आहे. मात्र मुंबईत येऊनही त्यांच्या पदरी निराशा आली आहे. ते पूर्वी काम करत असलेल्या ठिकाणी अद्यापही काम सुरू झालेले नाही. अनेक ठिकाणी कामगार कमी पैशात काम करावे लागतय तर काही ठिकाणी पैसेच मिळत नसल्याने पुढे करायचे काय, जगायचे कसे हा प्रश्न या कामगारांसमोर उभा ठाकला आहे.

लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर खालीद हुसैन हा कामगार उत्तर प्रदेशातील आपल्या घरी निघून गेला होता. परिस्थिती एक-दीड महिन्यात पूर्ववत होईल, असा त्याचा अंदाज होता. मात्र, पाच महिने त्याला घरातच बसावे लागले. जवळपास असलेली सर्व जमापूंजी संपली. सरकार काहीतरी मदत करेल, अशी अपेक्षा त्याला होती. मात्र, ती फोल ठरली. शेवटी त्याने पुन्हा एकदा मुंबईत परतण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत त्याने आपल्या ठेकेदाराशी संपर्क साधला आणि तो मुंबईला परतला. खालीद हुसैन आपल्या 12 सहकाऱ्यांसह परतले. मात्र मुंबईत येताच त्यांना 14 दिवस क्वारंटाईन व्हावे लागले. 14 दिवसांचे पैसे आपल्याला ठेकेदाराकडून मिळतील अशी त्याला आपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली. 

ठेकेदाराने खालीद हुसैनच्या सहकाऱ्यांना पैसे दिले मात्र अपेक्षेपेक्षा कमी मिळाले. त्यामुळे कामगारांची फारच फरफट सूरू झाली. कामगारांना पोटा-पाण्याचा प्रशस्न कसा सोडवायचा हाच मोठा प्रश्न पडला. काही दिवस तर कामगारांनी केवळ उकडलेला भात खाऊन काढले. अशी परिस्थिती लाखो कामगारांची आहे. लाखो कामगार कामासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र त्यांना काम मिळत नाही. काही ठिकाणी काम मिळतंय पण योग्य पैसे मिळत नाहीत. यापूर्वी रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगाराला 500 रूपये मिळायचे, त्याऐवजी आता 350 रूपये मिळत आहेत. यासर्व प्रकारामुळे रोजचं गणित बिघडलं असून घरी पैसे कसे पाठवायचे, असा प्रश्न बलवारीलाल गुप्ता या कामगाराला पडला आहे. त्यामुळे जगायचे कसे हा प्रश्न कामगारांपुढे उभा ठाकला आहे.

मुंबईत आलेले अनेक कामगार सध्या कामाच्या शोधात वणवण भटकत आहेत. कामाची माहिती विचारण्यासाठी अनेक फोन दररोज येत असल्याचे कामगार एकता संघाचे संस्थापक अध्यक्ष  प्रदीप वाघणारे यांनी सांगितले. कामगारांना मदत मिळणे महत्वाचे आहे. कामगारांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटेल किमान इतकी मदत तरी शासनाने या कामगारांना देणे महत्वाचे असल्याचे प्रदीप वाघमारे यांनी सांगितले.
----
संपादन : ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com