esakal | वंदेभारत अभियानांतर्गत तब्बल 'इतके' प्रवासी मुंबईत दाखल; आणखी 76 विमानं येणार..
sakal

बोलून बातमी शोधा

vande bharat  mission

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने राज्य शासन वंदेभारत अभियान यशस्वीरित्या पार पाडत आहे.

वंदेभारत अभियानांतर्गत तब्बल 'इतके' प्रवासी मुंबईत दाखल; आणखी 76 विमानं येणार..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई:  वंदेभारत अभियानांतर्गत 82 विमानातुन तब्बल 13 हजार 456 प्रवासी मुंबईत दाखल झाले असून ते विविध देशातून मुंबईत आले आहेत. 1 जुलै पर्यंत आणखी 76 विमानांनी प्रवासी मुंबईत येणार आहेत. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने राज्य शासन वंदेभारत अभियान यशस्वीरित्या पार पाडत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आतापर्यंत मुंबईत 13 हजार 456 प्रवाशांमध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या 4989 इतकी आहे. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या 4364 आहे तर इतर राज्यातील प्रवाशांची संख्या 4103 इतकी आहे. आलेल्या सर्व प्रवाशांना महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार 24 मे पर्यंत क्वारंटाईन करण्यात येत आहे.

 हेही वाचा: बापरे! तब्बल 600 अभियंत्यांना 'या' कामांसाठी जुंपले; महापालिकेचे विकासकामांकडे दुर्लक्ष..

मुंबईतील प्रवाशांची संस्थात्मक क्वारंटाईन सुविधा विविध हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठवण्याची व्यवस्था जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांच्यामार्फत करण्यात येत आहे. या प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी गेल्यानंतर संबंधित जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांमार्फत क्वारंटाईन केले जात आहे.

इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत त्यांना मुंबईत क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात येते व त्या प्रवाशांचा प्रवासी वाहतूक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच त्यांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येत आहे.

हेही वाचा: 'बेस्ट'ला मिळालं तब्बल 'इतक्या' लाखांचं उत्पन्न; ६ लाख कर्मचारी करतायत प्रवास..

या देशांमधून आले प्रवासी: 

आलेले प्रवासी हे विविध देशांमधून आले आहेत त्यामध्ये ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, अमेरिका, बांगलादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगानिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया, स्पेन, आर्यलँड, कतार, हाँगकाँग, कझाकिस्तान, मॉरिशियस, ब्राझील, थायलंड,केनिया, मियामी, व्हियतनाम, इटली, स्विडन, इथोपिया, रोम, जर्मनी, दुबई, मालावी, वेस्ट इंडिज, नॉर्वे, कैरो, युक्रेन आदी देशांचा समावेश आहे.

many people came to mumbai under vande bharat mission 

loading image