

Mumbai e-Bike Taxi: Traffic Experts Divided
esakal
नितीन जगताप
मुंबई : राज्य परिवहन प्राधिकरणाच्या १८ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत ई-बाइक टॅक्सीसेवेसाठी परवाना देण्याचा निर्णय घेतला होता. या बैठकीत भाडे एकसमान ठेवण्यास मान्यता देण्यात आली. ही सेवा सुरू करण्यासाठी मुंबई महानगर क्षेत्रात तीन कंपन्यांना प्राथमिक परवाना दिला असून, मंगळवारपासून (ता. १६) ही सेवा सुरू झाली आहे. ई-बाइक टॅक्सीसेवेमुळे वाहतूक कोंडी फुटेल का, याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.