

Vasai Stray Dogs Attack
ESakal
वसई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरात अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांची दहशत पसरल्याचे दिसून येत आहे. लहान मुलांसह, तरुण आणि वृद्धांवर भटके कुत्रे हल्ला करत असल्याच्या घटना घडत आहेत. अशा घटनांमध्ये नागरिक जखमी होत असून काहींचा दुर्दैवी मृत्यू देखील होत असल्याचे समोर येत आहे. अशीच एक घटना वसईत घडल्याचे समोर आले आहे. वसईत एका मुलीच्या मागे भटक्या कुत्र्यांचा कळपच अंगावर धावून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.