'तो' तब्बल 15 व्या चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह निघाला, डिस्चार्ज मिळण्याची वाट पाहण्याऱ्या मकसूद खानची कहाणी

'तो' तब्बल 15 व्या चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह निघाला, डिस्चार्ज मिळण्याची वाट पाहण्याऱ्या मकसूद खानची कहाणी

मुंबईः वरळीतील नेस्कोच्या कोविड केंद्रात आतापर्यंत 250 कर्करुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली. मात्र 35 वर्षाच्या मकसूद खान मात्र अजूनही डिस्चार्च मिळण्याची वाट पाहतोय. मात्र जोपर्यंत मकसूदची चाचणी निगेटीव्ह येणार नाही. तोपर्यंत रुग्णालय प्रशासन त्याला सोडणार नाही. आणि मकसूदची आतापर्यंत 15 वी कोविड चाचणीही पॉझिटीव्ह आली आहे.

उत्तरप्रदेशमध्ये राहणाऱ्या मकसूदला ब्लड कँसर झाला आहे. डिसेंबर महिन्यात उपचारासाठी तो मुंबईला आला होता. टाटा मेमोरियल रुग्णालयात मकसूदचे 9 केमो थेरेपी सेशन झाले. 26 मेला मकसूदला बरे वाटत नव्हते. डॉक्टरांनी चाचणी केली. तेव्हा त्याला कोविड असल्याच निष्पण्ण झाले. मकसूदला तातडीने वरळीच्या कोविड केंद्रात हलवण्यात आले. या ठिकाणी कँसरसाठी राखीव असलेल्या वार्डमध्ये मकसूदवर उपचार सुरु झाले.

मकसूदची ऑक्सिजन लेवल बरोबर आली, तापही कमी झाला. मात्र स्वॅबचे नमुने पाठवले तेव्हा तो पॉझिटीव्ह आढळला. आतापर्यंत 13 स्वॅब नमुणे केंद्राने प्रयोगशांळांना निदान करण्याकरीता पाठवले. मात्र, सर्वच्या सर्व पॉझिटीव्ह आढळले. निदान करतांना तांत्रिक चुका झाल्या का हेदेखील तपासले गेले. मात्र तिथेही तो पॉझिटीव्ह असल्याचे सिध्द झाले. महापालिकेच्या कोविड नियमानूसार जोपर्यंत रुग्णाची चाचणी निगेटीव्ह येत नाही. तोपर्यंत त्याला सोडता येत नाही. त्यामुळे मकसूद या केंद्रात अडकून पडला आहे.

कोविड केंद्रात राहून निराश

कोविड केंद्रात राहून मकसूदला निराशा आली आहे. एकदा त्याने केंद्रातून पळण्याचा प्रयत्नही केला. तो सारखा डॉक्टरांना प्रश्न विचारतो. मी शारीरीक फीट आहे, ऑक्सिजनचे प्रमाण योग्य आहे, श्वास घ्यायला त्रास होत नाही. मग मला इथून का सोडत नाही. तूम्ही मला इथे केव्हापर्यंत ठेवणार आहात? असा त्याचा प्रश्न असतो. मकसूद विटामीन सीच्या गोळ्या खातो. गरम पाणी पितो. योगा करतो. मात्र दिवस संपला की त्याची निराशा वाढत चालली आहे. मकसूदला त्याच्या बायकोची, चार मुलाची आठवण येते. कर्करोगाशी सामना करण्यासाठी तो मुंबईत आला, मात्र इथे त्याला आता फसल्यासारखे वाटतंय.

इथल्या डॉक्टरांनी मकसूदच्या रुपात पहिल्यांदाच असा रुग्ण बघितला आहे. यापुर्वी दोन कर्करुग्ण चार चाचणीत कोविड पॉझिटीव्ह निघाले, मात्र पाचव्या चाचणीत ते निगेटीव्ह निघाले. मकसूद पहिला रुग्ण आहे, ज्याची 15 वी चाचणीही पॉझिटीव्ह आली आहे. त्यामुळे कदाचित मकसूदला अधिक काळ केद्रात राहावे लागेल. शुक्रवारी मकसूदची 16 वी चाचणी होणार आहे. डॉक्टरांना आशा आहे की ही चाचणी निगेटीव्ह निघेल.

कदाचित मकसूदला कर्करोगावर दिलेल्या औषधीमुळे हे होत असावे अस एका डॉक्टरांनी म्हटले आहे. त्यामुळे मकसूदचे प्रकरण वैद्यकीय अभ्यासक्रमात संशोधन करण्याजोगे प्रकरण आहे. असे या डॉक्टरचे म्हणणे आहे. 

मकसूदसाठी कोविडचे नियम मोडू शकत नाही. त्यामुळे त्याला घरी पाठवले तर कोरोना संसर्गाचा वाहक ठरु शकतो अशी भिती टाटा मेमोरियलचे डॉ पंकज चतुर्वेदी यांनी व्यक्त केली. मकसूदला कदाचित त्याच्या उत्तरप्रदेशमधील त्याच्या गावी पाठवण्यावर आम्ही विचार करतोय अस वरळी कोविड केंद्रासोबत सम्नवय ठेवणाऱ्या टाटा मेमेरियलच्या डॉक्टर याग्निक वझा यांनी सांगितले. आता वाट आहे 16 व्या चाचणीची. 

हा जो रुग्ण खुप महिन्यांपासुन कोरोना पॉझिटिव्ह आहे. त्याच्यावर सुरु असणार्या कर्करोगावरील उपचारांमुळे कदाचित त्याची चाचणी निगेटिव्ह येत नाही. त्याचे इथे कोणीच नातेवाईक नाहीत. पालिकेच्या नियमांप्रमाणे त्याची चाचणी जोपर्यंत निगेटीव्ह येत नाही तोपर्यंत त्याला घरी सोडता येणार नाही. जशी याची चाचणी निगेटिव्ह आली की तसेच त्यांना आम्ही त्यांच्या घरी विमान किंवा ट्रेनने पाठवू. त्यांचे आम्ही समुपदेशन करत आहोत. त्यासाठी 6 जणांची टीम आहे. 

डॉ. याग्निक वाझा, काॅर्डिनेटर, कर्करोग, एनएससीआय केंद्र

(संपादनः पूजा विचारे)

Maqsood Khan tested positive in 15th corona waiting be discharged

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com