आरक्षणासाठी मराठा महासंघाची छगन भुजबळ यांना मदतीची हाक

विकासासाठी एकत्रित काम करण्याचे आवाहन
Maratha Federation need help from Chhagan Bhujbal for maratha reservation mumbai
Maratha Federation need help from Chhagan Bhujbal for maratha reservation mumbaisakal

मुंबई : मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे अशी मागणी केल्यानंतर अखिल भारतीय मराठा महासंघाने आता यासंदर्भात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मराठा समाजाबरोबर येऊन मराठा-ओबीसी समाजाच्या एकत्रित विकासासाठी प्रयत्न करण्याची साद घातली आहे.अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. शशिकांत पवार यांनी आज येथे एका विशेष निवेदनाद्वारे छगन भुजबळ यांना हे आवाहन केले आहे. आज महात्मा फुले जयंतीनिमित्त भुजबळ यांनी केलेल्या काही विधानांच्या धागा पकडून पवार यांनी त्यांना वरीलप्रमाणे भावनिक आवाहन केले आहे.

भुजबळ हे अनेकदा माळी-ओबीसी समाजाचा अभिमानाने उल्लेख करतात, त्यांनी या समाजांसाठी स्वतःला वाहूनही घेतले आहे. मात्र भुजबळ हे राज्यातील सर्वच गरीब जनतेच्या विकासाचा ध्यास घेतलेले नेते आहेत. त्यांनी पूर्वी शिवसेनेला राज्याच्या कानाकोपऱ्यात नेण्यासाठी केलेले प्रयत्नही सर्वांनी पाहिले आहेत. त्यामुळे अशा ज्येष्ठ नेत्याने आपल्याला माळी आणि ओबीसी समाजापुरते मर्यादित ठेवू नये. उलट मराठा समाजालाही ओबीसींमध्ये समाविष्ट करून सर्वच ओबीसी समाजाचा विकास करण्याची विशाल भूमिका त्यांनी घ्यावी, असे आवाहनही पवार यांनी केले आहे.

महात्मा फुले हे केवळ एका जातीपुरते सीमित नव्हते, त्यांनी ब्राह्मण स्त्रियांसह सर्वच स्त्रियांना शिक्षित करण्याचे, त्यांना जुन्या चालीरीतींच्या जोखडातून सोडविण्याचे व त्यांचा विकास करण्याचे महान काम केले होते. तसेच मराठा समाजाचे आर्थिक मागासलेपण घालविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. आज जसजशी लोकसंख्या वाढत आहे, तसतसे शेतजमीनीचे तुकडे पडून मराठ्यांचा आर्थिक विकास खुंटतो आहे. त्यामुळे भुजबळ यांनी गरीब मराठा समाजाचा विचार करून मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका घ्यावी, असे आवाहनही पवार यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com