esakal | मराठा महासंघात नेतृत्वाचा संघर्ष
sakal

बोलून बातमी शोधा

मराठा महासंघात नेतृत्वाचा संघर्ष

मराठा महासंघात नेतृत्वाचा संघर्ष

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्रात गरीब, मजूर मराठा समाजाच्या आर्थिक आणि न्याय हक्काचा लढा उभा करणाऱ्या मराठा महासंघातच आता नेतृत्वाचा संघर्ष निर्माण झाला आहे. महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी स्वतःची मराठा महासंघाच्या अध्यक्ष म्हणून निवड झाल्याचे जाहीर केल्यानंतर महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत पवार यांनी तातडीने कार्यकारिणीची बैठक बोलावून कोंढरे यांची सरचिटणीस पदावरून हकालपट्टी केली आहे. यामुळे मराठा महासंघातील उभी फूट समोर आली.

मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत पवार यांनी दादरच्या शिवाजी मराठा संस्थेत बैठक बोलावली होती. यामधे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांची पदावरून हकालपट्टी करतानाच त्यांनी नेमणूक केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका रद्द केल्या आहेत. दरम्यान, सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी रविवारी ( ता. ३) पुणे येथे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून अध्यक्षपदाचा ठराव मांडून स्वतःची अध्यक्ष म्हणून नेमणूक झाल्याचे जाहीर केले. यावरूनच मराठा महासंघात शशिकांत पवार विरूध्द राजेंद्र कोंढरे असा नवा वाद सुरू झाला.

कोंढरेना अधिकार नाही : पवार

संघठनेच्या अधिकृत घटनेनुसार कोंढरे यांना अशा प्रकारचा निर्णय अथवा बैठक घेण्याचा अधिकार नसल्याचा दावा मराठा महासंघाच्या वतीने केला. या निर्णयाला आव्हान देण्यासाठी आज अध्यक्ष शशिकांत पवार यांनी मुंबईत कार्यकारिणी बैठक बोलावली होती. संस्थेच्या घटनेनुसार २०२० मधे अध्यक्षपदाची बिनविरोध निवड झाली. घटनेच्या नियमानुसार नवा अध्यक्ष निवडताना निवडणूक होते. पण राजेंद्र कोंढरे यांनी हा नियम न पाळता स्वतःला अध्यक्ष म्हणून निवडल्याचा आरोप आजच्या कार्यकारिणी बैठकीत करण्यात आला. त्यामुळे राजेंद्र कोंढरे यांची मराठा महासंघातून हकालपट्टी करण्याचा ठराव संमत केल्याची माहिती शशिकांत पवार यांनी दिली.

loading image
go to top