
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. आझाद मैदानात जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना शांततेचं आवाहन केलंय. रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये याची काळजी आपण घ्यायची असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून हुकुमशाही केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलाय. आंदोलन जिथं आहे त्या भागातील खाऊ गल्ल्या बंद ठेवण्याचा अलिखित आदेश पोलिसांनी दिला असल्याचं रोहित पवार म्हणालेत. त्यांनी एक फोटोही पोस्ट केला आहे.