
मुंबईतील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची मुदत संपली असून यावर मुंबई उच्च न्यायालयात याबाबत पुन्हा सुनावणी सुरु झाली.मनोज जरांगे पाटील यांचे वकील सतीश माने-शिंदे यांनी उद्या ११ वाजेपर्यंत वेळ वाढवून मागितला. यावर उच्च न्यायालयाने तुम्ही कोणत्या अधिकाराने तिथे बसलात? तात्काळ आंदोलकांना जागा सोडण्यास सांगा असे सांगितले. तुमच्या सूचना पुरेशा नाहीत आता कारवाई व्हायला हवी असे म्हटले. तसेच आम्ही सुनावणी उद्यापर्यंत सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलू पण आधी तुमचा जबाब घ्यावा लागेल असेही म्हटले. दरम्यान उच्च न्यायालयाने राज्य सरकारवरही ताशेर ओढले. आता यावर उद्या दुपारी एक वाजता सुनावणी होणार आहे.