
आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही अशी आठवणही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी विरोधकांना करुन दिली आहे.
मुंबई : “मराठा आरक्षण लढाई अंतिम टप्प्यात आहे, ही लढाई आम्ही जिंकणारच”, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. रेकॉर्डवर सांगतो आहे, मराठा आरक्षण देताना इतरांना धक्का लावणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केले आहे. ते पुरवणी मागण्यांवरील चर्चेवेळी बोलत होते. आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही अशी आठवणही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी विरोधकांना करुन दिली आहे.
महत्त्वाची बातमी : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन : उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील 45 महत्त्वाचे मुद्दे
माझ्या सहकारी मंत्र्यांनी समर्पक उत्तर दिले आहे, आता तुम्ही आमच्या मानगुटीवर बसायचे ठरवले असेल तर माहित नाही. सर्वानुमते ही लढाई आपण तिथे लढतोय, ही लढाई जिंकल्याशिवाय आपण राहणार नाही, ही लढाई जिंकावी अशी माझी प्रार्थना आहे. मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात वकिलांची फौज जशीच्या तशी आहे, भूमिकेत बदल नाही, काहीही बदललेले नाही. वेळोवेळी संघटनांबरोबर चर्चा चालू असते, अशोक चव्हाण तर अनेक वेळा वकीलांबरोबर चर्चा करतात. ही लढाई सुरु असताना मध्येच कुणाच्या सडक्या डोक्यातून निघाले माहित नाही. मराठा समाजाला त्यांचे न्याय हक्क मिळवून देताना दुसऱ्या समाजाचे आम्ही एक कणही काढणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
महत्त्वाची बातमी : मला पाडून दाखवा, भर सभागृहात अजित पवारांनी स्वीकारलं मुनगंटीवारांचं चॅलेंज
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, 'ज्या कोणी समाजविघातक शक्ती जातीपातीत संघर्ष आग लावण्याचा प्रयत्न करत असतील तर त्या आगीवर पाणी टाकावे लागले. आपण टाकले नाही तर राज्यातील जनता पाणी टाकेल. विरोधी पक्षांनी आमचे पुस्तक वाचन केले. आधी कुंडल्या बघत होत्या, कुंडल्या बघणारे आता पुस्तक वाचायला लागले आनंद आहे. मुहुर्त बघत होते आज पडणार उद्या पडणार. कुंडल्या कुणी कुणाच्या बदलू शकत नाही. हे अधिवेशन दोन दिवसांचे घ्यावे लागले. दोन दिवस का घ्यावे लागले तर कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केले.
मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
फडणवीस दिल्लीत जावेत ही तर मुनगंटीवारांची इच्छा, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. मेट्रो प्रकल्पात मिठागराचा खडा न टाकण्याचा सल्लाही त्यांनी विरोधकांना दिला आहे.
maratha reservation cm uddhav thackerays important comment in legislative assembly winter session 2020