Manoj Jarange Patil News: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील शुक्रवारीपासून आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या पावलाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असून, आंदोलकांचा ओघ सतत वाढत आहे.
मुंबई : राज्यभरात आंदोलने केल्यानंतर आता मराठा समाज आझाद मैदानावर ठामपणे धडकला आहे. “मुंबई हा देशाचा श्वास आहे. येथून जर आरक्षणाची आरोळी ठोकली, तर सरकारला ऐकावंच लागेल आणि त्याचा आवाज जगभर पोहोचेल,” असा ठाम विश्वास आंदोलक व्यक्त करत आहेत.