'मराठा आरक्षण विरोधकांशी थेट न्यायालयातच लढू'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 जानेवारी 2019

वाशी - मराठा समाजाला या सरकारने आरक्षण दिले आहे. पण या आरक्षणाला अनेकांकडून विरोध करून अडचणी निर्माण करण्यात येत आहे; मात्र सरकार यासाठी सक्षम असून या विरोधकांना थेट न्यायालयात लढा देऊ, असे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी नवी मुंबईत केले.

महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन व प्राना फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या घणसोलीतील कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, काही जण सामान्य माथाडी  कामगारांना वेठीस धरून खोटे परवाने बनवतात. त्याच्यांकडून खंडणी वसूल करतात. अशा खंडणी वसूल करणाऱ्यांना कधीच सोडणार नाही. राज्यातील भाजप सरकार हे आत्तापर्यंत नेहमी माथाडी कामगारांच्या पाठीशी उभे राहिले असून यापुढेदेखील उभे राहील. तसेच माथाडी कामगारांच्या घराचा, प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकार, सिडको यांच्याशी चर्चा करून क्‍लस्टर डेव्हलपमेंटचा निर्णय घेऊ, असे फडणवीस म्हणाले. माथाडी कामगारांच्या हॉस्पिटलसाठी असणारा भूखंड त्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन या वेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. 

Web Title: Maratha Reservation Opposite to Fight Against Court says Devendra Fadnavis