
मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण द्या या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. गेल्या तीन दिवसांपासून त्यांचं मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू आहे. जरांगे यांच्या आंदोलनाला चौथ्या दिवशी आझाद मैदान पोलिसांनी परवानगी दिलीय. तर जरांगे यांनी १ सप्टेंबरपासून पाणीही घेणार नाही असा पवित्रा घेतला आहे. दरम्यान, मराठा बांधवांची आझाद मैदान परिसरात जेवण-खाण्यासह इतर सुविधांची गैरसोय होत असल्यानं मुंबई बाहेरून मदत येत आहे. पण मदत घेऊन येणाऱ्यांनाच पोलीस अडवत असल्याचा आरोप आता केला जात आहे. याचे व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.