Food trucks sent to Maratha agitators at Azad Maidan : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. या आंदोलनाला राज्यातून मोठा प्रतिसाद मिळतो आहे. लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. अशावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा बांधवांसाठी अन्न-पाण्याची सोय करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.