कोरोना लस साठवणूकीसाठी मुंबई महापालिका सज्ज; महापौरांकडून कांजुरमार्गच्या जागेची पाहणी

तुषार सोनवणे
Saturday, 5 December 2020

  • मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज कांजुरमार्गच्या जागेची लसींच्या साठवणूकीची पाहणी केली. 
  • लसींच्या कोल्ड स्टोरेजसाठी 5000 चौरस फूट जागेची गरज भासणार आहे.

मुंबई - जगभरातील अनेक कोरोनालसींचे संशोधन अंतिम टप्प्यात आहे. भारतातील लसीदेखील येत्या काही महिण्यात उपलब्ध होऊ शकतात असे संकेत मिळत आहेत. त्या मुळे लसीच्या वितरणासाठी मुंबई महापालिकेनेही कंबर कसली आहे. त्यादृष्टीने नियोजन सुरू आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी लसीचे वितरण आणि साठवणूकीसाठी पालिका सज्ज असल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा - मुंबईसह राज्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

कोरोना लसींच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आहेत. येत्या काही महिण्यात या लसी उपलब्ध होऊ शकतात. मुंबई मध्ये कोरोनाने हाहाकार उडवला होता. असंख्य लोकांना कोरोनाने ग्रासले होते. कित्येकांनी आपले प्राण गमावले. अशा परिस्थितीत मुंबई महापालिकेने पुर्ण यंत्रणा कामाला लावत कोरोनाशी दोन हात केले. आता कोरोना लसींचे वितरण आणि साठवणूकीची तयारी पालिकेकडून करण्यात येत आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज कांजुरमार्गच्या जागेची लसींच्या साठवणूकीची पाहणी केली.  लसींच्या कोल्ड स्टोरेजसाठी 5000 चौरस फूट जागेची गरज भासणार आहे. लसींच्या साठवणूकीठिकाणी सुर्यप्रकाश पोहचू नये याची काळजी घेणार आहे.

हेही वाचा - 'राहुल गांधींवर केलेल्या टीकेबाबात यशोमती ठाकूर कडाडल्या; महाविकास आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर

महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले की, ' कांजूरमार्गच्या आरोग्य विभागाच्या जागेवर कोरोना लसींची साठवणूक होईल. जानेवारी महिना या ठिकाणी यंत्रणा उभी करण्यात लागू शकतो. लसींच्या वितरणात जे कोव्हिड वॉरियर्स  पुढे आले आहेत. ज्यांमध्ये डॉक्टर, परिचारीका, पोलिस आदींना प्राधान्य दिलं जाईल, कारण ही लोकं सर्वसामान्यांना सेवा देत आहेत. लसी सर्वांनाच देण्यात येतील. त्यात कोणताही श्रीमंत गरीब मध्यम असा भेदभाव करण्यात येणार नाही.'

 

Mumbai Municipal Corporation ready for corona vaccine storage Inspection of Kanjurmarg site by the Mayor


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Municipal Corporation ready for corona vaccine storage Inspection of Kanjurmarg site by the Mayor