esakal | राज्य मंत्रीमंडळाचा महत्वाचा निर्णय : SEBC उमेदवारांना 'सवर्ण' आरक्षणाचा लाभ
sakal

बोलून बातमी शोधा

राज्य मंत्रीमंडळाचा महत्वाचा निर्णय : SEBC उमेदवारांना 'सवर्ण' आरक्षणाचा लाभ

सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गात किंवा ईडब्ल्यूएस (EWS)  आरक्षणातून लाभ घेणे ऐच्छिक असेल,

राज्य मंत्रीमंडळाचा महत्वाचा निर्णय : SEBC उमेदवारांना 'सवर्ण' आरक्षणाचा लाभ

sakal_logo
By
संजय मिस्कीन

मुंबई : एसईबीसी (SEBC) उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे (EWS) आरक्षणाचा लाभ शैक्षणिक प्रवेश व सेवाभरती यासाठी होण्याकरिता EWS चे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गात किंवा ईडब्ल्यूएस (EWS)  आरक्षणातून लाभ घेणे ऐच्छिक असेल, उमेदवाराने शैक्षणिक प्रवेशातील किंवा शासन सेवेत भरतीकरिता ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घेतल्यास सदर उमेदवार एसईबीसी आरक्षणाच्या लाभास पात्र ठरणार नाही. ईडब्ल्यएस प्रमाणपत्र देतांना एसईबीसी उमेदवारांना मागील आर्थिक वर्षाच्या उत्पन्न व मत्ता याआधारे राज्य शासनाने विहीत केलेले निकष लावण्यात येतील.

हेही वाचा : अजित पवार यांचं शिवसेनेबाबत अत्यंत महत्त्वाचं आणि मोठं विधान, आजच्या बैठकीत दिल्या स्पष्ट सूचना

हे आदेश सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली विशेष अनुज्ञा याचिका क्र. 15737/2019 व इतर याचिकांमधील अंतरीम आदेशावरील निर्णयाच्या अथवा अंतिम निर्णयाच्या अधीन राहतील.

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा 

maratha reservation SEBC EWS maharashtra cabinet decision uddhav thackeray