मराठा आरक्षण तात्काळ द्यावे  - ब्रिगेडियर सुधीर सावंत 

दिनेश चिलप मराठे
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

मुंबादेवी : मराठा आरक्षणाला आप चा पाठिंबा असून सरकारने मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे. दिल्ली येथे भारताचे संविधान राज्यघटना जाळणाऱ्याचा जाहिर निषेध करतो. सरकारने त्यांच्यावर कारवाही करुन दोषीवर खटला दाखल करावा अशी मागणी आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी मुंबई प्रेसक्लब येथे पत्रकारांशी संवाद साधताना केली.

आप पक्षाच्या माध्यम संयोजक टीमच्या सर्व नवनियुक्त सहकाऱ्यांची ओळख पत्रकारांना करुन दिली. राज्यभरातील पक्षाच्या आंदोलन आणि कार्यक्रमाची माहिती प्रसार माध्यमांशी संपर्क साधीत देईल दिली जाईल. गणेशोत्सवानंतर आप धडाक्यात राज्यभर पोहोचेल. जिल्हा, तालुका आणि स्थानिक बूथ स्तररावर आम्ही कार्यकर्ते पदाधिकारी नियुक्त करीत असून लवकरच आपच्या सदस्यता नोंदणीस स्थानीयस्तरापासून सुरुवात केली जाईल असे हि सावंत यांनी सांगितले.

आप पक्षाचे महाराष्ट्रात भ्रष्टाचार मुक्त लोक कल्याणकारी सरकार आणणे असा प्रयत्न असून आम्ही आमच्या समविचारी पक्षांशी संपर्क साधित आहोत. लोकसभा व विधानसभा निवडणूक पक्षातर्फे महाराष्ट्रातून लढविण्यात येणारे आहे. महाराष्ट्रात भाजपा शिवसेना युतीचे सरकार फसवे आणि धोकेबाज असून यांना जनता अरबी समुद्रात बुडवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर काँग्रेस राष्ट्रवादी पेक्षा 'आप' हाच पर्याय होऊ शकतो. महाराष्ट्राला उत्तम सरकार देण्यासाठी ग्रामीण भागापासून आम्ही सुरुवात करतोय असेही सावंत म्हणाले.

आपच्या महाराष्ट्र कार्यकारणीतील 
श्याम सोनार, रुबेन म्हस्कारेन्स, राधिका नायर, मुकुंद किरदात, अभिजीत मोरे, जितेंद्र भावे, रोनक मस्तकार, अभिषेक भट्ट यांची आप महाराष्ट्र प्रसार माध्यम समितीवर नियुक्ती करण्यात आलेली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha reservation should be given immediately - Brigadier Sudhir Sawant