
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईत आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरूय. हायकोर्टाने या आंदोलनावरून मनोज जरांगे पाटील यांना फटकारलंय. तर हे आंदोलन हाताबाहेर गेलंय, मंगळवारी दुपारपर्यंत मुंबई रिकामी करा असे आदेश राज्य सरकारला दिलेत. यानंतर दक्षिण मुंबईसह इतर भागातून आंदोलक मुंबई बाहेर जात आहेत. दरम्यान, पनवेलमध्ये मराठा तरुणांना मारहाण झाल्याची घटना घडलीय. पुण्याहून पिकअपने मुंबईला येत असताना गाडी घासल्याच्या कारणावरून ही मारहाण करण्यात आलीय. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पाच जणांना अटक करण्यात आलीय.