#MarathaKrantiMorcha तिन्ही मार्गांवर रेल रोको

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

मुंबई - बंद शांततापूर्ण करण्याचा दावा केलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर ‘रेल रोको’ करून मुंबईची लाईफलाईन बंद पाडण्याचा प्रयत्न केला. यामुळे मध्य, हार्बर व पश्‍चिम रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळित झाली. 

ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी-नेरूळ मार्गावर दुपारी साडेबारा वाजल्यापासून आंदोलकांनी ‘रेल रोको’ केल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. चार तासानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत होऊ शकली. 

प्रथम पश्‍चिम रेल्वे मार्गावर जोगेश्वरी स्थानकात चर्चगेटला जाणारी ९ वाजून १६ मिनिटांची जलद लोकल आंदोलकांनी रोखून धरली. त्यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. लोहमार्ग पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढून त्यांना रुळावरून बाजूला केल्याने १० मिनिटांनी लोकलसेवा पूर्ववत झाली.

ठाणे स्थानकात सकाळी सव्वा दहाच्या सुमारास आंदोलकांनी वेगवेगळ्या रुळांवर उतरून अप आणि डाउन लोकल अडवल्या. ठाण्याहून कल्याणकडे जाणारी आणि सीएसएमटीहून आसनगावला जाणारी लोकल रोखण्यात आली. आधी कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकलपुढे शेकडो कार्यकर्ते जमा झाले. जोरदार घोषणाबाजी झाली. पोलिसांनी समजूत काढून त्यांना रुळावरून हटवण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या बाजूला सीएसटीएमकडे निघालेल्या लोकलपुढे आंदोलकांच्या एका गटाने ठाण मांडले. आंदोलकांनी या तिन्ही लोकलच्या टपावर बसून जोरदार घोषणाबाजी केली. काही आंदोलकांनी मनमाड-सीएसएमटी एक्‍सप्रेसही अडवली. 

ट्रान्सहार्बर मार्गावर घणसोली स्थानकातही रेल रोको करण्यात आला. ठाणे स्थानकात सकाळी १०.२० ते १०.२४ पर्यंत, ट्रान्सहार्बरवर घणसोलीत सकाळी ९. ५९ ते १०.२४ पर्यंत व दुपारी १२.२५ ते सायंकाळी ४.३० पर्यंत वाहतूक विस्कळित झाली होती.

आंदोलनाचा परिणाम 
 मध्य रेल्वे मार्गावरील ५६ गाड्या रद्द;      ८० गाड्यांना विलंब.
 पश्‍चिम रेल्वे मार्गावरील १५ गाड्या रद्द;         ३० गाड्यांना विलंब.

Web Title: #MarathaKrantiMorcha The three routes Rail Roko