esakal | अवकाश यानाच्या बांधणीत मराठी युवतीचा सहभाग
sakal

बोलून बातमी शोधा

अवकाश यानाच्या बांधणीत मराठी युवतीचा सहभाग

अवकाश यानाच्या बांधणीत मराठी युवतीचा सहभाग

sakal_logo
By
टिम इ सकाळ

कल्याण, ता. १४ : अमेरिकेच्या ब्ल्यू ओरिजिन कंपनीतर्फे ‘न्यू शेफर्ड’ हे खासगी यान काही निवडक पर्यटकांना घेऊन मंगळवारी (ता.२०) अवकाशात झेपावणार आहे. हे यान बनवणाऱ्या दहा जणांच्या चमूमध्ये कल्याणच्या संजल गावंडे या तरुणीचा समावेश आहे. (Marathi girl Sanjal Gawande participated in the construction of the spacecraft pvk99)

अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस व त्यांच्या बंधूसह सहा जणांना ‘न्यू शेफर्ड’ यान ११ मिनिटांची अवकाश सफर घडविणार आहे. ‘ब्ल्यू ओरिजिन’तर्फे अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रात न्यू शेफर्डचे उड्डाण होणार आहे. याची रचना करण्यासाठी संजलची निवड झाली होती. कोळसेवाडी (कल्याण पूर्व) परिसरात राहणाऱ्या अशोक आणि सुरेखा गावंडे यांच्या मध्यमवर्गीय कुटुंबात अत्यंत साधेपणाने संजलचे बालपण गेले. मुंबई विद्यापीठातून मेकॅनिकल अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून पदव्युत्तर शिक्षणासाठी ती मिशिगन टेक विद्यापीठात गेली. संजलने अमेरिकेतील विविध कंपन्यांमध्ये नोकरी केली.

हेही वाचा: मुंबई 'मेट्रो 3' प्रकल्पाच्या खर्चात 10 हजार 270 कोटींची वाढ

अवकाश क्षेत्रात विशेष रस असलेल्या संजलने विमान चालवण्याचे प्रशिक्षणही घेतले आहे. व्यावसायिक वैमानिक म्हणून २०१६ मध्ये तिला परवाना मिळाला. ‘नासा’मध्ये काम करण्याचे तिचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही, परंतु ब्ल्यू ओरिजिन कंपनीमार्फत अंतराळ क्षेत्रात काम करण्याची संधी संजलला मिळाली.

हेही वाचा: मुंबईत पावसाची संततधार सुरूच; गारव्याने नागरिक सुखावले

loading image