

मुंब्रा: मराठी भाषेत बोलण्याचा आग्रह धरणाऱ्या तरुणावर महाराष्ट्रातच कान पकडून माफी मागण्याची वेळ आली. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा शहरात हा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. फळ विक्रेत्याला मराठीत बोलण्यास सांगणाऱ्या तरुणाला स्थानिकांनी घेराव घातला, आणि उलट हिंदीत बोलण्याचा हेका धरला. अखेर तरुणाने 'मुझसे गलती हो गयी, मुझे माफ कर दो' असं म्हटलं. या प्रकरणाचे तीव्र पडसाद सोशल मीडियावर उमटले असून मराठी भाषिकांनी संताप व्यक्त केला आहे.