मराठी भाषा भाकरीची भाषा बनावी : डॉ. श्रीपाल सबनीस यांचे मत 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 मार्च 2020

मुंबई : भाकरीचा प्रश्‍न आणि मराठी भाषा एकत्र जोडण्याचा प्रयोग आणि प्रयत्न व्हावेत. केवळ भाषा सक्ती करून चालणार नाही. सध्या मराठी मनामध्ये इंग्रजीचे वेड आहे. या वेडात महाराष्ट्र वाहून जातो असल्याने मराठीच्या जोरावर भाकरी मिळवून देण्याचा प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे मराठी भाषा ही भाकरीची भाषा बनवायला पाहिजे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी "सकाळ"शी बोलताना व्यक्त केले. 

हेही वाचा - कोरोनाच्या धास्तीमुळे मुंबई-पुणे प्रवास मंदावला

सर्व केंद्रीय मंडळांच्या शाळांमध्ये मराठी सक्तीचा कायदा राज्य सरकारने विधानसभेत मंजूर केला. याविषयी सबनीस यांचे मत जाणून घेण्यात आले. सबनीस म्हणाले की, राज्य सरकारची मराठीबाबतची भूमिका प्रामाणिक आहे. मराठी आणि महाराष्ट्राचे नाते अर्थपूर्ण व्हावे, अशी प्रामाणिक इच्छा दिसते आहे. म्हणूनच सरकारने मराठी सक्तीचा कायदा केला आहे. कायदा करून काही दिवस झाले आहेत; परंतु पुढील प्रक्रियेला काही दिवस वेळ लागतो. यासाठी त्यांना वेळ दिला पाहिजे. समजा, शाळा 1 तारखेला सुरू झाल्या; मात्र त्यानंतर कायदा झाल्यावर तो सर्व शाळांना लागू होईल. त्यामुळे आठ दहा दिवसांचा वेळ झाला म्हणून आपण सरकारला दोष देण्याचे कारण मला योग्य वाटत नाही. मात्र, सरकारने याबाबत वेगाने काम करावे. केवळ कायदा करून उपयोग नाही, त्याची अंमलबजावणी महत्त्वाची असल्याचेही ते म्हणाले. 
 
marathi language should be income source shripal sabanis

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi language should be income source shripal sabanis