कोरोनाच्या धास्तीमुळे मुंबई-पुणे प्रवास मंदावला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 मार्च 2020

पुण्यात कोरोना संसर्गाचे पाच रुग्ण आढळल्यानंतर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या या शहरात कामानिमित्त किंवा फिरायला जाणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.

मुंबई : पुण्यात कोरोना संसर्गाचे पाच रुग्ण आढळल्यानंतर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या या शहरात कामानिमित्त किंवा फिरायला जाणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. एसटी महामंडळाच्या शिवनेरी बससेवेतील प्रवाशांच्या संख्येत घट झाली असून, खासगी वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे दिसत आहे. 

महत्वाची बातमी ः यंदा IPL होणार प्रेक्षकांविना, सरकार घेणार का हा मोठा निर्णय ?

सांस्कृतिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक महत्त्व असल्यामुळे पुणे शहरात राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिकांचा सतत ओघ असतो. पुण्यात कोरोना विषाणूची बाधा झालेले पाच रुग्ण आढळल्यामुळे विविध कामांसाठी जाणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. पुण्याला जाण्याऐवजी दूरध्वनी किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कामे करण्यावर भर दिला जात आहे. 

महत्वाची बातमी ः कोरोना आला मुंबईत ! मुंबईतील दोघांना कोरोनाची लागण...

पुण्यातील कोरोनाच्या पाच रुग्णांनी कोणत्या वाहनांतून प्रवास केला, याचा तपास सुरू असल्याने मुंबई-पुणे खासगी वाहतूकदारांत भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे काही व्यावसायिकांनी वाहने उभी करून ठेवल्याचे सांगण्यात आले. 

महत्वाची बातमी ः 'कोरोना'संदर्भातील बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत, नागरिकांनी...

 कोरोना संसर्गाच्या शक्‍यतेमुळे वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील यात्रा जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केल्या आहेत. आता पुण्याकडे येणाऱ्या प्रवाशांमध्येही घट झाली आहे. 
- राहुल तोरो, महाव्यवस्थापक, एसटी महामंडळ (वाहतूक विभाग) 

मालवाहतुकीसह संपूर्ण वाहतूक क्षेत्र काहीसे थंडावले आहे. कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे व्यावसायिक पुण्याला जाणे टाळत असून, दूरध्वनी व व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कामे पूर्ण करत आहेत. 
- बल मलकीत सिंग, उपाध्यक्ष, ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट कॉंग्रेस 

विमानतळावरील टुरिस्ट टॅक्‍सीला तब्बल 40 तासांनंतर भाडे मिळत आहे. कोरोना संसर्गामुळे विमान प्रवाशांच्या संख्येत घट झाल्याने मुंबई-पुणे टॅक्‍सीचालकांना फटका बसला आहे. 
- एम. एल. क्वाड्रोस, मुंबई टॅक्‍सीमेन्स युनियन 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: passengers on mumbai pune route decreased