प्रसिद्ध बिल्डर अविनाश भोसले यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

सुनिता महामुणकर
Wednesday, 24 February 2021

ईडीच्या फेऱ्यात आलेले पुण्यातील बिल्डर अविनाश भोसले यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने ता 4 मार्चपर्यंत अटक न करण्याचा दिलासा दिला आहे

मुंबई  : ईडीच्या फेऱ्यात आलेले पुण्यातील बिल्डर अविनाश भोसले यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने ता 4 मार्चपर्यंत अटक न करण्याचा दिलासा दिला आहे. 

बांधकाम व्यावसायिक भोसले आणि त्यांचा मुलगा अमीत यांच्याविरोधात अमंलबजावणी संचालनालयाने गुन्हा दाखल केला आहे. परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या (फेमा) अंतर्गत आणि मनी लौण्ड्रिंगच्या आरोपात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच त्यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्सही बजावण्यात आली आहेत. आज न्यायालयाने भोसले यांना दिलेल्या दिलासाचा अवधी 4 मार्चपर्यंत कायम केला.

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी आणि समन्सच्या विरोधात भोसले यांनी याचिका केली आहे. याचिकेवर न्यायालयाने अंतरिम निर्देश दिले असून दोघांवर कठोर कारवाई न करण्याचे निर्देश ईडीला दिले. याचिकेवर लेखी बाजू मांडण्याचे निर्देश न्यायालयाने यापूर्वी दिले आहेत.

पुणे, मुंबई आणि कोल्हापूरमध्ये प्रवर्तक एबीआयएल समूह लोकप्रिय आहे. बांधकाम क्षेत्रात विविध प्रकल्प त्यांनी पूर्ण केले आहेत. ईडीने मागील काही दिवसांत त्यांच्या कार्यालयांमध्ये छापे टाकले होते.

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

marathi latest news Mumbai High Court grants relief Avinash Bhosale live update


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi latest news Mumbai High Court grants relief Avinash Bhosale live update