बाळासाहेबांनी 'ज्या' लुंगीला केला विरोध, तीच लुंगी नेसून आदित्य ठाकरेंचा प्रचार!

राजू सोनावणे आणि सुमीत सावंत, मुंबई 
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

शिवसेनेची स्थापनाच मुळी मराठी भाषा आणि मराठी अस्मितेच्या मुद्यावर झालीय. मात्र मतांसाठी शिवसेनेनं आता थेट लुंगीवर उतरल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय. विशेष म्हणजे एकेकाळी बाळासाहेब ठाकरेंनी दाक्षिणात्यांविरोधात एकेकाळी एक खास नारा देत देत त्यांना सळो की पळो करवून सोडलं होतं. 

मुंबई : काहीही झालं तरी माझा शिवसैनिक वाकणार नाही, झुकणार नाही, असं छातीठोकपणे सांगणाऱ्या बाळासाहेबांची हीच का  ती शिवसेना?  असं, म्हणण्याची वेळ आता आलीय. त्याला कारण ठरलंय आदित्य ठाकरेंची ही वेशभूषा.

विधानसभेत पाऊल टाकण्यासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे वरळीतून निव़डणूक लढवतायेत. त्यांच्या विजयासाठी शिवसैनिक अख्खा मतदारसंघ पिंजून काढतायेत. विजयासाठी शिवसेनेला मराठी मतांसोबत गुजराती आणि दाक्षिणात्यांची गरज भासू लागलीय. त्यामुळे 'केम छे' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता लुंगीचीही गरज वाटू लागलीय. तर शिवसेनेची ही भूमिका म्हणजे कालानुरूप बदल असल्याचं नेते सांगातयेत. 

शिवसेनेची स्थापनाच मुळी मराठी भाषा आणि मराठी अस्मितेच्या मुद्यावर झालीय. मात्र मतांसाठी शिवसेनेनं आता थेट लुंगीवर उतरल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय. विशेष म्हणजे एकेकाळी बाळासाहेब ठाकरेंनी दाक्षिणात्यांविरोधात एकेकाळी एक खास नारा देत देत त्यांना सळो की पळो करवून सोडलं होतं. 

आदित्य ठाकरेंचा हा लुंगी प्रचार पाहता शिवसेना आता पुर्वीसारखी राहिलेली नाही. त्यामुळे सत्तेसाठी भविष्यात सेनेनं मराठीचा मुद्दाही सोडून दिला तर आश्चर्य वाटायला नकोत.

WebTitle : marathi news aaditya Thackerays political campaign in southern language   

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Aaditya Thackerays political campaign in southern language