आदिवासी साहित्यिकांची सातासमुद्रापार भरारी

भगवान खैरनार
सोमवार, 15 जानेवारी 2018

मोखाडा - दुबई व बँकाँक येथील पहिल्या दोन विश्व साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनानंतर यावर्षी बाली, इंडोनेशिया येथे तिसरे विश्व साहित्य संमेलन दिनांक 13  ते   16 जानेवारी या दरम्यान पार पडणार आहे. या विश्व साहित्य संमेलनासाठी पालघर जिल्ह्यातून 4 आदिवासी कवी, साहित्यिकांची निवड झाली असून, त्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला आहे. आदिवासी कवी, साहित्यिकांनी सातासमुद्रापार भरारी घेतल्याने त्यांचे संपूर्ण पालघर जिल्हयातून कौतुक केले जात आहे. 

शब्द साहित्य मंडळ आयोजित, या साहित्य संमेलनास महाराष्ट्रातून सुमारे दिडशेहून आधिक साहित्यिक, संमेलनासाठी उपस्थित राहणार असून जगभरातील अनेक साहित्य चाहत्यांना या साहित्य संमेलनाची पर्वणी अनुभवता येणार आहे. या साहित्य संमेलनासाठी निंमत्रित कवी म्हणून जव्हार तालुक्यातील  प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले आदिवासी कवी मधुकर भोये, कवी साहित्यिक रवी बुधर, आणि कवी व सामाजिक कार्यकर्ते मनोज कामडी व कवी किशोर डोके संमेनात सहभागी झाले आहेत. 

पहिल्यांदाच सातासमुद्रापार आपल्या साहित्याची  पताका फडकवणा-या या चारही आदिवासी कवींचा जव्हारचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल व अपर जिल्हाधीकारी श्रीधर डुबे पाटील यांनी सत्कार केला आह़े त्यानंतर ते इंडोनेशिया बाली येथे साहित्यसंमेलनासाठी रवाना झाले आहेत. या सर्व कवींवर जिल्हयातील साहित्य प्रेमींसह, नागरिकांनी कौतुकाचा वर्षाव करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच या साहित्यिक कवींनी विश्व साहित्य संमेनात पालघर जिल्ह्यातील आदिवासींचं साहित्य मांडावे अशी इच्छा सर्व चाहत्यांनी शुभेच्छा देताना व्यक्त केली आहे.

Web Title: marathi news Aadivasi vishwa sahitya sammelan bali Indonesia