अभिताभ करणार अग्निसुरक्षेचे आवाहन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 मार्च 2018

मुंबई - मुंबईत पहिल्यांदाच अग्निसुरक्षेबाबत विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी "फायर कॉम्बॅक्‍ट' उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत सिनेअभिनेता अमिताभ बच्चन नागरिकांना अग्निसुरक्षेचे आवाहन करण्याची शक्‍यता आहे. यासंबंधी राज्य अग्निसुरक्षा संचालनालय आणि मुंबई अग्निशमन दलाच्या वतीने 8 ते 10 मार्च या कालावधीत वरळी येथील राष्ट्रीय क्रीडा संकुलात ही परिषद होणार आहे. 

मुंबईत डिसेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात आगीच्या दुर्घटना घडल्या होत्या. त्यात अग्निसुरक्षेशी केलेल्या तडजोडींमुळे अनेकांना जीव गमवावे लागले. राज्य आणि देशातील अनेक शहरांमध्ये अशा दुर्घटना घडत आहेत. त्यानिमित्ताने नागरिकांना अग्निसुरक्षेची जाणीव करून देण्यासाठी पहिल्यांदाच अशा प्रकारची परिषद होणार आहे. या परिषदेत होणाऱ्या अग्निसुरक्षेबाबतच्या विविध चर्चासत्रांत अनेक तज्ज्ञही मार्गदर्शन करू शकतील. नागरिकांनी या परिषदेत सहभागी व्हावे, तसेच आगीच्या वेळी अग्निशमन दलाच्या जवानांना सहकार्य करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन संचालक प्रभात रहांदळे यांनी केले आहे. 

या परिषदेला अमिताभ बच्चन, रणदीप हुडा, टायगर श्रॉफ सहभागी होण्याची शक्‍यता आहे. हे सर्व अभिनेते नागरिकांना अग्निसुरक्षेचे पालन करण्याबाबत आवाहन करणार आहेत. तसेच आगीच्या वेळी प्राथमिक उपाय करण्यासाठी अग्निशमन दलाने नागरिकांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. त्यात सहभागी होण्याचे आवाहनही हे सिनेअभिनेते करण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: marathi news Amitabh Bachchan fire safety