अमोल कोल्हेंच्या नावाची अध्यक्षपदासाठी घोषणा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

मुंबई - नाट्य परिषद अध्यक्षपदासाठी मोहन जोशी पॅनेलच्या वतीने अभिनेते अमोल कोल्हे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. आग्रह झाल्यास पुन्हा अध्यक्ष होण्याची इच्छा मोहन जोशी यांनी व्यक्त केली होती; मात्र अचानक पॅनेलच्या वतीने अमोल कोल्हे यांचे नाव पुढे आल्याने नाट्यवर्तुळात चर्चांना वेग आला आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकांमध्ये मोहन जोशी पॅनेल आणि प्रसाद कांबळी यांचे आपलं पॅनेल यांच्यात चुरस होती. त्यामध्ये मुंबईत आपलं पॅनलचा वरचष्मा दिसून आला. आपलं पॅनेलचे 11; तर मोहन जोशी पॅनेलच्या वतीने पाच जण मुंबई आणि विभागातून जिंकून आले आहेत.

31 उमेदवारांचा पाठिंबा आवश्‍यक
अध्यक्षपदासाठी 31 उमेदवारांचा पाठिंबा आवश्‍यक आहे. त्यामुळे कांबळी यांना 20; तर जोशी यांना 26 जणांचा महाराष्ट्रातून पाठिंबा आवश्‍यक आहे. बुधवारी (ता. 14) रात्री महाराष्ट्रातील विजेत्या तब्बल 36 हून आधिक जणांनी मोहन जोशी यांच्या पॅनेलला पाठिंबा दिला आहे. तसेच अध्यक्षपदासाठी अमोल कोल्हे यांच्या नावाची घोषणा केल्याची माहिती पॅनेलच्या प्रवक्‍त्या लता नार्वेकर यांनी दिली; तर प्रतिस्पर्धी कांबळी पॅनेलच्या वतीनेही 40 हून अधिक जणांच्या पाठिंब्याचा दावा केला आहे. येत्या 19 तारखेला कार्यकारिणीसाठी अर्ज भरण्यात येणार आहेत. त्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात चित्र स्पष्ट होईल.

Web Title: marathi news amol kolhe natya parishad chair person