असह्य दुर्गंधीची समस्या कायम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 मार्च 2018

बेलापूर - जुईनगर आणि सानपाडा यांच्या मध्यभागी असलेल्या व एमआयडीसीचे सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यामुळे दोन्ही ठिकाणचे नागरिक दुर्गंधीने हैराण झाले आहेत. या नाल्याची आजवर साफसफाई केली नसल्याने त्यात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. पालिका प्रशासनाने अनेकदा या नाल्यातील गाळ काढण्याचे व दुरुस्तीचे केवळ आश्‍वासनच दिले असून या वर्षीही अंदाजपत्रकात या नाल्याच्या दुरुस्तीसाठी तरतूद केली नसल्याने नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागणार आहे. 

जुईनगर रेल्वेस्थानकाच्या शेजारी एमआयडीसीचे सांडपाणी वाहून नेणारा मोठा नाला आहे. या नाल्याची पालिका प्रशासनाकडून साफसफाई होत नसल्याने त्यात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सांडपाण्याची डबकी तयार झाली आहेत. या नाल्यामध्ये येणारे एमसयडीसीतील सांडपाणी प्रक्रिया न करता सोडण्यात येते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून डासांचे प्रमाण वाढले आहे. त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. याविरोधात लोकप्रतिनिधींनी अनेकदा आवाज उठवला; परंतु प्रत्येक वेळी पालिका प्रशासनाकडून फक्त आश्वासन देण्यात आले. गेल्या वर्षी नाल्याच्या कडेला असलेल्या झाडांमधून माकड आले होते. त्यानंतर या नाल्यामध्ये मगरीचेही अनेक वेळा नागरिकांना दर्शन झाले होते. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. 

नाला परिसरातील वाढलेल्या झाडाझुडपांमधून साप निघण्याचे प्रमाण वाढले आहे. पालिका प्रशासनाने या वर्षीच्या अंदाजपत्रकात या नाल्याच्या स्वच्छतेसाठी आणि डागडुजीसाठी तरतूद केली नसल्याने येथीस नागरिक निराश झाले आहेत. 

नाला व्हीजनकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचला असून दुर्गंधी आणि कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. काही दिवसांपूर्वी येथे मगर आढळली होती. त्यामुळे जाळी लावण्याचे काम सुरू आहे; परंतु निधी कमी पडत असल्याने ते अपूर्ण आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
- ऋचा पाटील, नगरसेविका

प्रशासनाने सादर केल्या अंदाजपत्रकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमधील कामे तपासण्यात येतील. यामध्ये जुईनगर-सानपाडा यांना जोडणाऱ्या नाल्याचा समावेश नसल्यास तो केला जाईल. 
- अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त

Web Title: marathi news belapur Juinagar railway station MIDC health