Marathi News Belgaon News Police Theft Lakh Gold Mobile
Marathi News Belgaon News Police Theft Lakh Gold Mobile

कारची काच फोडून सव्वा लाखाचा ऐवज लंपास 

बेळगाव - मध्यवर्ती बस स्थानकाजवळ (सीबीटी) पार्क करण्यात आलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी सुमारे सव्वा लाख रुपये किमतीचे 4 तोळे सोन्याची बॅग, 2 हजार रुपयांची रोकड व 1 मोबाईल संच लंपास केला आहे. 

गोवा येथील पुंडलिक विठ्ठल जावेर सोमवारी (ता.25) अथणी तालुक्‍यात ऐनापुरला गेले होते. औषध घेऊन गोव्याला जाण्यासाठी आज (ता.26) निघाले. गोव्याला जाण्यापूर्वी बेळगावात विश्रांती व भाजी खरेदीसाठी थांबले. मध्यवर्ती बस स्थानकाजवळ कार पार्क केली. पुंडलिक, त्यांची पत्नी व दोन मिळून बाजारपेठला गेले. सकाळी अकरा ते साडे अकरा वाजण्याच्या सुमारास कारकडे परतले. त्यावेळी कारची काच फोडून बॅग अज्ञातांनी लांबवली होती.

परिसरात चौकशी केली. पण, त्याचा सुगावा लागला नाही. मार्केट पोलिसांना त्याची कल्पना दिली. पोलिस निरीक्षक रमेश होगार आणि सहाय्यक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून माहिती घेतली. त्यावेळी बॅगमध्ये सव्वा लाख रुपये किमतीचे 4 तोळे सोने, 2 हजार रुपयांची रोख रक्कम आणि एक मोबाईल संच होता, अशी माहिती दिली. मार्केट पोलिस चौकशी करत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com