आयुक्त बदलीला विरोध

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 मार्च 2018

भिवंडी - भिवंडी महापालिकेचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांची राज्य सरकारने स्थानिक राजकारण्यांच्या दबावाला बळी पडून सव्वा वर्षात नियमबाह्य पद्धतीने तकाफडकी बदली केली आहे, असा आरोप करत नागरिकांनी सरकारी धोरणाचा शुक्रवारी (ता.१०) मोर्चाद्वारे निषेध केला. आज सकाळी शहरातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी एकत्रित येऊन उपविभागीय कार्यालयावर मोर्चा नेला. या वेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आयुक्तांची बदली ताबडतोब रद्द करा, या मागणीचे निवेदन नागरिकांनी प्रांत अधिकारी एस. थिटे यांना दिले.

शिस्तप्रिय म्हणून ख्याती असलेले आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांची बदली अवघ्या सोळा महिन्यांतच केल्याने प्रशासकीयदृष्ट्या ती अन्यायकारक आहे. ती रद्द करावी, या मागणीसाठी आज संभाजी ब्रिगेड, भिवंडी शहर विकास परिषद, इंडियन युवा मोर्चा, भिवंडी संघर्ष समिती, मुस्लिम फाऊंडेशन आणि नागरिकांनी आंदोलन केले. संघर्ष कृती समितीचे मुस्तफा मुलानी, समाजसेवक अनंता पाटील, सुझानी अन्सारी, सुहास बोंडे, जावेद आझमी, अनिस मोमीन, शरद पाटील, कल्पेश कोरडे, साजाद शेख यांनी मागणीचे निवेदन दिले. 

पणन महासंघ व्यवस्थापकीय संचालकपदी बदली
अनधिकृत इमारतींवर कारवाई करू नये, नगरसेवकांविरोधात सुरू केलेली कारवाई थांबवण्यात यावी, आदी मागण्यांसाठी त्यांच्यावर राजकीय दबाव वाढत होता. त्याला न जुमानता आयुक्तांनी कारवाई सुरू ठेवल्याने पक्षांच्या राजकीय नेत्यांसह पालिकेतील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या बदलीसाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर राज्य सरकारने त्यांची महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ; मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली केली आहे.

Web Title: marathi news bhiwandi Opposition to the Commissioner